शेतकरी बांधवांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत त्यांच्या फॉर्म स्थितीबद्दल आणि पुढच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संदेश (SMS) पाठवण्यात आले आहेत. त्यात पेमेन्ट करण्यासाठीही संदेश पाठवला होता. यात ज्या शेतकरी बांधवांनी पेमेन्ट केले आहे त्यांना आता त्यांच्या फॉर्मसमोर विक्रेता निवडण्यासाठी पर्याय देण्यात आला आहे. तरी पात्र शेतकरी बांधवांनी चांगल्या विक्रेताची निवड करावी. तर आपण या विषयी सविस्तर माहिती पाहू या.
मागेल त्याला सौर कृषी पंप निवड पद्धत
शेतकरी बांधवानो, या योजनेत काही दिवसांपूर्वी पेमेन्ट करण्यासाठी संदेश (SMS) प्राप्त झाले होते. ज्या शेतकरी बांधवांनी 3 HP साठी अर्ज केला होता, अशा शेतकरी बांधवांना 22,000 ते 23,000 रुपये भरणा करण्यासाठी संदेश प्राप्त झाले होते.
ज्या शेतकरी बांधवांनी 5 HP साठी अर्ज केला होता, अशा शेतकरी बांधवांना 32,000 ते 33,000 रुपये भरणा करण्यासाठी तर ज्या शेतकऱ्यांनी 7.5 HP पंप साठी अर्ज केला होता, अशा शेतकरी बांधवांना 44,000 ते 45,000 रुपये इतका भरणा करण्यासाठी संदेश पाठवण्यात आले होते. भरपूर शेतकरी बांधवांनी पेमेन्ट प्रक्रिया ही पूर्ण केली.
फॉर्म भरण्याच्या बाबतीत जालना जिल्हा हा प्रथम क्रमांकावर तर बीड जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर होता. इतके फॉर्म भरण्याचे कारण म्हणजे वेळेवर शेतकरी बांधवांना वीज दिली जात नाही. ठराविक वेळेसाठी वीज दिली जाते, त्यात पण शॉर्ट सर्किट, वीजपुरवठा काही कारणास्तव खंडित होणे अशा भरपूर गोष्टींनी शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत.
म्हणून प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात सोलर पंप लावण्यासाठी इच्छुक आहे. मग या योजनेत जो शेतकरी सर्वात आधी येईल म्हणजे आधी फॉर्मची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करेल, त्या शेतकऱ्याची निवड ही पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवली जाते. त्या अनुषंगाने सरकारने अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या अर्जामध्ये वेंडर निवडण्याचे ऑप्शन उपलब्ध करून दिले आहे.
जेणेकरून शेतकरी बांधव हा चांगल्या कंपनीचे सोलर हे आपल्या शेतात बसवण्यासाठी निवडू शकतो. शेतकरी बांधवांनी सोलर पंप विक्रेता कंपनी निवडताना त्या कंपनीविषयी माहिती काढून विचार करून वेंडर निवडायचा आहे. त्या पेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे कोणती सोलर कंपनी चांगली सेवा देते हे पण शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे, त्या नुसार त्याची निवड करावी.
हे पण वाचा – मागेल त्याला सोलर पंपच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन संदेश, अर्जाची आणि पेमेंटची स्थिती तपासा |
सोलर पंप वेंडरची निवड कशी करावी
या योजनेत शेतकरी बांधव कशा प्रकारे वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करू शकतात, आपण सविस्तर पाहू या.
स्टेप 1. सर्वात आधी सरकारने तयार केलेल्या अधिकृत वेबपोर्टलवर जा – येथे क्लिक करा
स्टेप 2. त्या नंतर वेवपोर्टलवर दिसत असलेल्या “Beneficiary Services” लाभार्थी सेवावर जाऊन त्यामधून “Application Current Status” अर्जाची सद्यस्थितीवर क्लिक करायचे आहे. – येथे क्लिक करा
स्टेप 3. शेतकरी बांधवानो, समोर दिसत असलेल्या “Search by Beneficiary ID” मध्ये तुम्हाला तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस तयार झालेला लाभार्थी ID भरून घ्यायचा आहे. आणि “Search” या बटणावर क्लिक करायचे आहे. तुम्ही भरलेला ID बरोबर असेल तर तुमच्या समोर आता तुम्ही भरलेला अर्ज आणि त्याविषयी संपूर्ण माहिती दिसेल.
स्टेप 4. त्याखाली तुम्हाला “Vendor Select” वेंडर निवडा असा पर्याय दिला असेल. आता त्या पर्यायावर क्लिक करून घ्या. आता अर्जाच्या खाली एक पर्याय दिसेल.
स्टेप 5. “Vendor Assignment” समोरील Select Vendor वर क्लिक करून घ्या, आता तुमच्या समोर उपलब्ध असलेल्या वेंडरांची यादी दिसेल. त्यामधून एक वेंडर निवडून घ्या.
स्टेप 6. वेंडर निवडल्यावर खाली “Assign” बटण दिसेल. त्या बटणावर क्लिक केल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक “OTP” पाठवला जाईल.
स्टेप 7. “OTP” भरून तो सबमिट करा. अशा प्रकारे तुमची वेंडर निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
विशेष माहिती
विक्रेता निवड प्रक्रिया झाल्यानंतर महावितरण कार्यालयाकडे संपूर्ण डेटा जातो. ज्यात कोणत्या वेंडरला किती शेतकऱ्यांनी निवडले आहे. त्यानंतर त्या कंपनीकडून जॉईन सर्व्ह करण्यात येतो. सर्वे झाल्यानंतर सर्वे डेटा हा महावितरणकडे जमा केला जातो.
त्यानंतर महावितरण कंपनी परत सर्वे केलेल्या शेतकऱ्यांची निवड यादी बनवेल. आणि पुढील प्रक्रियेसाठी अर्ज पाठवला जाईल.
हे देखील वाचा – शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना |