नमस्कार शेतकरी बांधवानो, आपण पाहतच आहोत मागील 4-5 वर्षांपासून सरकार पीक पाहणीची पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून सरकारने डिजिटल क्रॉप सर्वेवर भर दिला आहे. आणि 2024 च्या रब्बी हंगामासाठीही लवकरच ई-पीक पाहणी सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये दोन पद्धतीने पीक पाहणी करू शकता. चला तर पाहू या सविस्तर माहिती.
डिजिटल क्रॉप सर्वे (Digital Crop Survey) आहे तरी काय?
आधी पीक पाहणी ही सरकारी अधिकारी शेतात जाऊन किंवा त्यांच्या कार्यालयात बसून करत असत. पण त्यात खूप वेळ लागायचा आणि संग्रहित माहिती सुद्धा पूर्णपणे बरोबर नसायची. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा किंवा पीक कर्ज घ्यायला खूप अडचणी यायच्या. म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि कृषी अधिकाऱ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म चालू केलं.
त्यात स्वतः शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकाविषयी माहिती भरू शकेल. यात सरकारने एक मोबाईल अॅप तयार केले. या अॅपमध्ये लॉगिन करून शेतकरी स्वतःच्या शेताची पीक पाहणी करू शकतो. या अॅपच्या माध्यमातून खूप साऱ्या पिकांची ई पीक पाहणी करता येते.
यात डिजिटल पद्धतीने केलेली ई-पीक पाहणी जमा केली जाते. आणि तिचा वापर हा सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी उपयोगात आणला जातो. यात शेताचा GPS लोकेशन ट्रॅक केला जातो, जेणेकरून अचूक लागवड झालेल्या जमिनीची पीक पाहणी नोंद व्हावी.
रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी कधी सुरू होणार आहे.
शासनाने संपूर्ण राज्यात पीक पाहणी करण्यासाठी आदेश काढला आहे. चला तर पाहू या आदेशात काय म्हटले आहे. सरकारने डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) अँप सुरू करणार आहे आणि या अँपचा वापर करून शेतकरी बांधवांना ई-पीक पाहणी करायची आहे.
संपूर्ण राज्यात 1 डिसेंबर 2024 पासून ई-पीक पाहणी करण्यास सुरुवात होणार आहे. दोन स्तरात ही पाहणी केली जाणार आहे. पहिला स्तर हा शेतकरी स्तरावर आणि दुसरा स्तर सहाय्यक स्तरावर पिकाची नोंद ही मोबाईल अँपद्वारे करण्यात येणार आहे.
1. पहिला टप्पा शेतकरी स्तरावर
त्यासाठी 01 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी केली जाणार आहे. यात शेतकरी बांधवाना प्ले स्टोअरवर सरकारने तयार केलेले अँप डाउनलोड करून घ्या. आणि शेतात जाऊन GPS location ऑन करून घ्या. आणि शेताची ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्या.
2. दुसरा टप्पा कृषी सहाय्यक स्तरावर
त्यासाठी 16 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कृषी सहाय्यक स्तरावर पीक पाहणी केली जाणार आहे. यात शेतकरी बांधवांना कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांची मदत घेऊन शेताची ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्यायची आहे.
ई पीक पाहणी करण्याचे फायदे
फायदा 1. पीक कर्ज घेण्यासाठी सोयीचे
बँकेतून पीक कर्ज घ्यायचे असेल तर अचूक नोंदणी सादर करणे गरजेचे असते. डिजिटल क्रॉप सर्वे मुळे शेतकरी बांधवांना कर्जाची प्रक्रिया करणे सोपे जाते.
फायदा 2. पीक विमा काढण्यासाठी उपयोगी आहे
राज्यात पीक विमा हा १ रुपयात भरला जातोय. त्यासाठी डिजिटल नोंदणी स्वीकारल्या जातात. म्हणून शेतकरी बांधवांनी डिजिटल ई पीक पाहणी केली असेल तर त्यांची पुढील फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोपी होईल.
फायदा 3. योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सोईस्कर
जर शेतकरी बांधवांनी डिजिटल ई-पीक पाहणी केली असेल, तर सरकारी योजनांचा लाभ घेण्यास सोईस्कर होईल.
फायदा 4. आपत्कालीन परिस्थितीत मदत
राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई किंवा क्षेत्रानुसार सर्वेक्षण करण्यासाठी जलद माहिती मिळू शकते आणि शेतकरी बांधवांना योग्य ती भरपाई शेतकरी बांधवांकडून मिळू शकते.
महत्त्वाचे टप्पे
1. सरकारने तयात केलेल्या मोबाईल अँपचा वापर करणे बंधनकारक.
2. तुमच्या शेताची क्षेत्रफळ, पीक प्रकार आणि अँपमध्ये मागितलेली माहिती नचुकता भरून घ्या.
3. पीक पाहणी करताना Geo Fencing बंधनकारक असेल. तुमची माहिती याचिका आहे का, एकदा जरूर खात्री करून घ्यायची आहे.
4. शेतकरी बांधव, फॉर्म भरताना तुम्हाला काही तांत्रिक अडचण येत असेल तर स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.