Maharashtra assembly election 2024 | जनतेने महायुतीला निवडून दिले

निवडणूक म्हंटल म्हणजे एका पक्षाचा विजय तर दुसऱ्या पक्षाचा हार हे चालतच राहते; पण त्यात ठरतात ते गेम चेंजर घोषणा आणि केलेले काम. यातलाच एक परिणाम आज आपल्याला महाराष्ट्रात (Maharashtra assembly election 2024) मध्ये पाहायला मिळाला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुती सरकारने महाराष्ट्रात केलेल्या कामांची आज त्यांना फळ हे जनतेने दिले आहे. आणि महायुतीने राज्यात पुन्हा एकदा त्यांचं वर्चस्व सिद्ध केलं आहे. महाविकास आघाडीचा खूप मोठा पराभव झाला. महायुतीने शेतकऱ्यांसाठी केलेली कामे, त्यांच्या साठी केलेल्या घोषणा, लाडक्या बहिणींसाठी सुरु केलेल्या कल्याणकारी योजना आणि महिलांचे प्रश्न सोडवले. या मुळे महायुतीचा या निवडणुकीत कोल वाढला तर महाविकास आघाडीचा खूप दारुण पराभव झाला.

Table of Contents

महायुती गठबंधनाच्या विजयाच्या मागचे महत्त्वाचे मुद्दे

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सरकारने जनतेच्या, महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप सारे निर्णय घेतले. आणि म्हणून जनतेने महायुती सरकारला पुन्हा निवडून दिले. पण या निवडणुकीत जे महायुतीचे महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण पाहू या.

1. शेतकरी वर्गाकडे सरकारचे विशेष लक्ष

महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी जितके शक्य होईल तितके काम करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने ही नवीन योजना राज्यात लागू केल्या जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले, राज्यात नमो शेतकरी योजना चालू करून शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6000 रुपये देण्यास सुरुवात केली.

नव्या घोषणेनुसार त्यात आणखी 3000 रुपयांची भर सरकार करणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने प्रचारादरम्यान शेतकरी बांधवांच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन पिकाला हमीभाव देण्याचे घोषित केले, 2023 मध्ये हमीभावापेक्षा कमी दरात शेतकरी बांधवांकडून कापूस आणि सोयाबीन खरेदी केला गेला. ते नुकसान लक्षात घेता सरकारने कापूस आणि सोयाबीन अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून अनुदान जमा केले, मागेल त्याला विहित, मागेल त्याला सोलर, या सारख्या अनेक कल्याणकारी योजना महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी घेऊन आले आणि त्याचाच फायदा हा सरकारला झाला.

2. महिला सशक्तीकरणासाठी चालू केलेल्या योजना

महायुती सरकारने महिलांसाठी आणि मुलींसाठी राज्यात खूप साऱ्या योजना लागू केल्या. बाकी जुन्या योजनांमध्ये बदल करून त्या पुन्हा राज्यात चालू केल्या. त्यात प्रामुख्याने महिलांची लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ही योजना जून 2024 मध्ये चालू करण्यात आली आणि याचा सर्वात जास्त लाभ हा महायुतीला झाला.

या योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या हेतूने 1500 रुपये प्रति महिना दिला जातो. सरकारच्या नवीन घोषणेनुसार त्यात आणखी भर करून महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहेत.

अजून खूप सारी योजना आहेत ज्या सरकारने चालू केल्या आहेत, जसे की लेक लाडकी योजना, महिला सन्मान योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. अशा अनेक कल्याणकारी योजना सरकारने सुरु केल्या, याचाच फायदा महायुती सरकारला झाला आणि त्यांचा विजय महाराष्ट्रात झाला.

3. नेतृत्वाची स्पष्ट भूमिका

महायुती सरकारच्या नेत्यांनी त्यांच्या कामाबद्दल जनतेला स्पष्टता दाखवली. त्यांनी जनतेला सरकारच्या कामांमध्ये पारदर्शक असल्याचे पटवून दिले. जनतेसमोर त्यांची बाजू स्पष्टपणे मांडली आणि त्याचाच फायदा त्यांना 2024 विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला.

4. घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला

महायुती सरकारने थेट मतदारांशी संवाद साधला, प्रत्येक गावात जाऊन त्यांनी केलेल्या कामांची आणि येणाऱ्या काळात करावयाची कामे, त्यांच्या समस्या या सर्व गोष्टींवर महायुती सरकारने लक्ष दिलं आणि याचाच परिणाम महायुती मतदारांचा विश्वास जिंकण्यास यशस्वी ठरला आणि विजयी झाला.

महाविकास आघाडीच्या अपयशामागे दिलेली कारणे असू शकतात

महाविकास आघाडीला या निवडणुकीत फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या काही चुका झाल्या त्या मुळे त्यांना हा पराभवाचा सामना करावा लागतोय. चला तर पाहू या यामागील काही महत्वाचे मुद्दे.

1. महाविकास आघाडीचा अंतर्गत गोंधळ

महाविकास आघाडीमध्ये एकमत हे दिसत नव्हते, पक्षांमधील मतभेद म्हणजे आधी जागा वाटपावरून किंवा काही निर्णय ठरवण्यावरून त्यांच्यात गैरसमज होता. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची प्रतिमा जनतेसमोर कमकुवत पडली. आणि याचाच फायदा महायुती सरकारला झाला.

2. महाविकास आघाडीचा महिला मतदारांकडे पाठ

महायुती सरकारने महिलांसाठी सुरु केलेल्या कल्याणकारी योजनांना आधी विरोध केला आणि नंतर महिलांचा कल पाहून महाविकास सरकारने त्यांच्या घोषणा पात्रात महिलांसाठी नवीन योजना आणली. पण महायुतीने याचा फायदा घेतला.

जर यांना महिलांविषयी इतकी काळजी होती आणि यांना त्यांच्या साठी योजना आणायची होती, तर आधी सुरु केलेल्या योजनेना विरोध का केला? या एका मुद्द्यामुळे ही त्यांना या निवडणुकीत फटका बसला आहे.

3. प्रचारात कमतरता

ज्या प्रकारे महायुती सरकारने प्रचार केला, म्हणजे घरोघरी जाऊन, प्रचार माध्यमांतून आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर. याचा फायदा तर त्यांना झालाच, पण जर महाविकास आघाडीने ही अशी मेहनत घेतली असती, तर आज कदाचित त्यांचा विजय झाला असता.

पण महाविकास आघाडी त्यांच्याच पक्षातून बंडखोरी केलेल्या नेत्यांचा पराभवासाठी प्रचार करत होती. त्यांनी जनतेचा विचार केला नाही. जनतेचा विचार केला असता, तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते.

निवडणुकीत महिलांची ठाम भूमिका आणि लाडकी बहिण योजनेचा प्रभाव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महिलांची भूमिका ही निर्णायक ठरली. महायुतीने राज्यात महिलांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यावर दिलेला भर हा महायुतीचा विजयाचा मोठा मुद्दा ठरला आहे. या योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने बनवल्या गेल्या आणि याचा महिला वर्गामध्ये सकारात्मक संदेश गेला.

महायुतीने सरकारला याचा खूप मोठा फायदा झाला. या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या वाढली होती. ही बाब लक्षात घेऊन महायुती सरकारने महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यांच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार, आणि सुरक्षा यांसारख्या मुद्यांवर महायुतीने सरकारने ठोस पाऊल उचलले आणि त्यांना पाठिंबा ही दिला, त्याचाच परिणाम आज महाराष्ट्र पुन्हा महायुती सरकार निवडून आला.

ग्रामीण भागातून पक्षांना महत्त्वाचा धडा

महाविकास आघाडीने त्यांच्या घोषणा पत्रात शेतकऱ्यांसाठी नवीन असे काही सांगितले नाही. प्रत्येक वेळी चालणारे सारखे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणे. पण जनतेला ते मान्य नव्हते. कारण त्यातले काही मुद्दे हे महायुती सरकारने पूर्ण केले आहेत आणि बाकी मुद्दे हे आता पूर्ण करणार आहेत. महाविकास आघाडी शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर समाधानकारक देऊ शकली नाही. म्हणून शेतकरी वर्गाची नाराजगी ही निवडणुकीच्या पराभवातून दिसून आली.

महायुती सरकारच्या पुढील आव्हाने आणि वाटचाल

1. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे लागतील

सरकार स्थापनेनंतर महायुती सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी ही लवकरात लवकर करावी लागेल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रभावी धोरण राज्यात राबवणे, सोयाबीन आणि कापूस हमीभाव, पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, कर्जमाफी, शेतीसाठी लागणाऱ्या वीजपुरवठ्याविषयी योग्य तो निर्णय सरकारला घ्यावा लागेल. आणि त्यावर अंमलबजावणीसुद्धा करावी लागेल.

2. महिलांसाठी घोषित केलेल्या योजनांची अंमलबजावणी

महायुती सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनापैकी काही योजना अजून प्रत्यक्षात अमलात आणायच्या बाकी आहेत. त्या योजना चालू करण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. तर त्या अडचणींना पर्यायी मार्गाने लवकरात लवकर राज्यात लागू करणे आवश्यक आहे.

3. सर्वसाधारण जनतेचा विकास

शिक्षण, आरोग्य किंवा पायाभूत सुविधा जेणेकरून जनतेला भविष्यात त्रास होणार नाही अशा सर्व सर्वसाधारण जनतेच्या समस्यांवर ग्रामीण आणि शहरी भागात समतोल साधत पायाभूत सुविधा उभारण्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.

निष्कर्ष

विधानसभा निवडणूक ही सर्वांसाठी एक आचर्य करणारी लढत ठरली आहे. महायुती सरकारच्या निवडणुकीच्या मुद्द्यांमुळे भविष्यात राजकारणाची दिशा ठरेल. महायुती सरकारने जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता करावी. तरच महायुती जनतेच्या विश्वासावर उतरतील. महाविकास आघाडी सरकारला त्यांच्या चुका लक्षात घेऊन त्यावर जोरदार काम चालू करायला हवे. नव्या ताकतीने, नव्या उमेदीने परत सुरु करावे.

Leave a Comment