पशु व्यवस्थापन : शेतकरी मित्रानो, वाढती थंडी ही पशुपालनासाठी खूप आव्हानात्मक असते. या हंगामात जनावरांचे विशेष ध्यान ठेवावे. थंड वातावरणामुळे पशूंच्या आरोग्यावर आणि उत्पन्नावर परिणाम पाहायला मिळतो. जनावरांचे योग्य नियोजन केले तर थंडीत सुद्धा जनावर तंदुरुस्त ठेवता येते. आणि त्यांचे विशेष पोषणतत्त्वांचे आणि पौष्टिक आहारावर लक्ष दिले तर उत्पन्नातही वाढ दिसेल. चला तर सविस्तर पाहू या, पशु व्यवस्थापन विशेष उपाययोजना करून थंडीच्या दिवसात पण उत्पन्न कसे वाढवू शकतो.
थंडीमुळे पशुपालनावर होणारे वाईट परिणाम
थंडी जास्त प्रमाणात वाढली तर जनावरांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो. पशुपालनावर थंडीमुळे काही समस्या ह्या उद्भवताना दिसू शकतात.
1. आजार
थंडी चालू झाल्यानंतर जनावरांना सामान्य आजारांचा धोका संभवू शकतो. त्यात सर्दी, न्यूमोनिया पाहायला मिळू शकतो. तरी डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन घेऊन उपचार करून घेणे आवश्यक आहे.
2. उत्पादन घट
जास्त थंड हवामानामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट पाहायला दिसू शकते तसेच त्यांच्या प्रजननक्षमतेवर याचा परिणाम दिसेल.
3. अन्न पचन
थंडीमध्ये भूक जास्त लागत नाही. आणि पचनक्रिया ही हिवाळ्यात मंदावते, त्यामुळे याचा परिणाम जनावरांवर पाहायला मिळतो. म्हणून त्यांना पूरक आणि पोषणतत्त्वांनी भरपूर असा आहार द्यायला हवा.
4. वाढ कमी होते
या जनावरांच्या पिल्लांची वाढ थंडीमुळे कमी होते.
हिवाळ्यात जनावरांसाठी आवश्यक उपाययोजना
1. जनावरांची राहण्याची व्यवस्था
हिवाळ्यात जनावरांसाठी उबदार आणि आरामदायक जागेची व्यवस्था करायला हवी. या दिवसांमध्ये हवेपासून संरक्षण करण्यासाठी पडद्याची किंवा गोंट्यांची व्यवस्था करायला हवी. झाल्यास जागेला उष्ण ठेवण्यासाठी गरम पाण्याचे हिटर किंवा बल्ब वापरावेत.
त्यांच्या बसण्याच्या जागी सुक्या गवताचे किंवा चटईचे नियोजन करणे आवश्यक आहे. या उपाययोजना तुम्ही त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी करू शकता.
2. जनावरांसाठी पोषण आहार
हिवाळ्यात शरीरातील उष्णता टिकवण्यासाठी जनावरांना जास्त उर्जेची गरज भासते. म्हणून त्यांच्यासाठी पोषक आहाराची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यात गहू, मका, बाजरी यासारख्या धान्यांचा वापर करणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये खनिजयुक्त आहाराचा समावेश करायला हवा.
त्यासोबतच गरम पाणी, सुक्या चाऱ्यात ओलसर गहू आणि हरभरा घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. जर तुमच्या जवळ दूध देणारे जनावरे असतील तर प्रथिनेयुक्त आहारात तुम्ही सोयाबीन आणि कडवळ यांचा समावेश करू शकता. हा आहार हिवाळ्यात जनावरांना दिला गेला पाहिजे.
अजून जास्त माहिती हवी असल्यास जवळील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल.
3. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन
हिवाळ्यात जनावरांचे पिण्याचे पाणी हे थंड होते. त्यामुळे जनावरे पुरेसे पाणी पित नाहीत. म्हणून तुम्ही दिवसातून 2-3 वेळेस कोमट पाण्याची व्यवस्था केली तर उत्तम होईल.
उपाययोजना म्हणून तुम्ही हिवाळ्यात त्यांच्या पाण्याची स्वतंत्र थंडीपासून बचाव होईल अशा जागी पाणी ठेवू शकता. पाणी नियमित स्वच्छ दिले गेले पाहिजे आणि त्यात निर्जंतुकीकरण करणे खूप महत्वाचे आहे.
4. हिवाळ्यात आजारांपासून जनावरांचे संरक्षण
हिवाळ्यात जास्त थंडीमुळे जनावरांमध्ये सर्दी, न्यूमोनिया, आणि खोकल्याचा प्राधुरभाव जास्त प्रमाणात पाहिला जातो. त्यासाठी पशुवैद्याचा योग्य सल्ला घेऊन उपचार करायला हवे.
हिवाळ्यात जनावरांना न्यूमोनिया, फूट अँड माउथ डिसीज (FMD) सारख्या आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या गोठ्याची स्वच्छता ठेवत चला, जेणेकरून जनावरांना हे आजार होणार नाहीत.
5. गाभण जनावरांची विशेष काळजी
गाभण जनावरांची हिवाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांना वेळोवेळी पिण्यासाठी कोमट पाणी, खनिजे, जीवनसत्त्वे, आणि प्रथिनेयुक्त चारा द्यावा, तसेच त्यांची बसण्याची जागा उबदार ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. वेळोवेळी डॉक्टरांचे योग्य सल्ला घेऊन उपचार करायला हवा.
6. लहान जनावरांचे नियोजन
लहान जनावरांना थंडीचा खूप जास्त धोका असतो. त्यासाठी त्यांना उबदार जागेची व्यवस्था करावी. त्यांच्या आजूबाजूला गोंट्याने संरक्षण करणे, जेणेकरून थंडीपासून त्यांचे संरक्षण होईल. त्याचा आहार हा पौष्टिक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा असावा.
7. दुधाळ जनावरांची विशेष काळजी
थंडीच्या दिवसात दुधाच्या उत्पादनावर परिणाम पाहायला मिळतो. त्यासाठी जनावरांना पुरेसा आराम आणि पौष्टिक आहार दिला गेला पाहिजे. त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागेची सोय करायला हवी.
हिवाळ्यात जनावरांसाठी विशेष उपाययोजना
1. थंडीपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी उबदार आणि स्वच्छ जागेची व्यवस्था.
2. हिवाळ्यात जनावरांची योग्य हालचाल होणे गरजेचे आहे. म्हणून त्यासाठी मोकळ्या जागेची व्यवस्था करणे खूप आवश्यक आहे.
3. जर तुमच्या गोठ्यातील जनावराला आजारपणाचे लक्षण दिसत असेल तर लगेच डॉक्टरांनाच सल्ला घ्या. जेणेकरून त्यांच्या वर योग्य वेळी योग्य उपचार होईल.
4. हिवाळ्यात जनावरांसाठी वेळोवेळी पौष्टिक आहार आणि स्वच्छ पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे.
हिवाळ्यात जनावरांच्या व्यवस्थापनासाठी मदत
सरकार जनावरांच्या आरोग्यासाठी मोफत लसीकरण आणि तपासणी शिबीर गावोगावी लावली जातात. सरकार जनावरांच्या खाद्यासाठी वेळोवेळी अनुदान देत राहते जेणेकरून चारा अभावी जनावरांचे हाल नको. शेतकरी बांधवांना जनावरे घेण्यासाठी सुद्धा सरकार अनुदान देते.