सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई-केवायसी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य योजना घोषित केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. शेतकरी ही ई-केवायसी आपल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या CSC सेंटर किंवा नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई-केवायसी करू शकतात. चला आपण ई-केवायसी कशी करायची हे समजून घेऊ या आणि अनुदान वाटप कधी चालू होणार आहे तेही पाहू.
सोयाबीन आणि कापूस अनुदान | Soyabin kapus anudan 2023
राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य योजना घोषित केली. ज्या शेतकऱ्यांकडे 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असेल त्यांना सरसकट 1000 रु. तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार 5000 रु. प्रति हेक्टर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
2 हेक्टरपर्यंत अट सरकारने लागू केली आहे. या योजनेसाठी सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. दिनांक 29 सप्टेंबर 2024 पर्यंत 68 लाख शेतकऱ्यांची कृषी विभागाने पडताळणी पूर्ण केली आहे.
ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि फॉर्म भरणे बाकी असेल अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे जाऊन लवकरात लवकर फॉर्म जमा करणे. म्हणजे तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार नाही. 46.68 लाख शेतकऱ्यांचे आधार क्रमांक हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेशी जोडले गेले आहेत. यांना ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही.
ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी करायचे बाकी आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची यादी ही प्रत्येक गावात लावण्यात आली आहे. आपले नाव तपासून ई-केवायसी करून घेणे. चला तर पाहू या ई-केवायसी कशी करायची.
सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी प्रोसेस – Soybean Kapus Anudan E-KYC full process
सोयाबीन कापूस अनुदान 2023 ई-केवायसी आपण कशी करू शकतो पाहू या
पाऊल 1:- कृषि विभागाच्या खरीप सोयाबीन कापूस अनुदान 2023 अर्थसहाय्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईटची लिंक – येथे क्लिक करा
पाऊल 2:- कृषि विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला “Disbursement Status” या बटणावर क्लिक करायचं आहे.
पाऊल 3:- क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. आधार नंबर आणि कॅप्चा भरायची जागा तुम्हाला दिसेल.
पाऊल 4:- त्यात तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. आणि खाली एक कॅप्चा दिसतोय, तो पण भरून घ्या.
पाऊल 5:- आता तुमच्या समोर दोन पर्याय दिसत आहेत एक OTP आणि दुसरा बायोमेट्रिक “Biometric” .
पाऊल 6:- मोबाईलने E-KYC करत असाल तर OTP पर्याय निवडा. (बायोमेट्रिक Biometric मशीन हे जास्त करून CSC सेंटरवर उपलब्ध असते)
पाऊल 7:- नंतर Get Adhar OTP क्लिक करा.
पाऊल 8:- तुमचा आधार क्रमांक सोयाबीन कापूस खरीप अनुदान 2023 अर्थसहाय्य योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध असेल तर तुम्हाला तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो व्यवस्थित टाकून Get Data या बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे सोयाबीन कापूस खरीप अनुदान 2023 ई-केवायसी पूर्ण होईल.
पाऊल 9:- तुम्ही तुमचा डेटा पोर्टलवर चेक करू शकता. आणि E-KYC स्टेटस काय आहे तेही तिथे दिसेल. तुम्हाला मोबाईलने जमत नसेल किंवा मोबाईलने ई-केवायसी करताना समस्या येत असतील तर तुम्ही CSC सेंटरकडे किंवा कृषी सहाय्यकांच्या कडे जाऊन सुद्धा ई-केवायसी प्रोसेस पूर्ण करू शकता.
पाऊल 10:- CSC सेंटरवर जाताना सोबत स्वतः व्यक्ती, आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर घेऊन जा. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना सांगा की तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदानासाठी बायोमेट्रिक ई-केवायसी करायची आहे.
CSC सेंटरवर वाले लगेच त्या शेतकरी बांधवांची बायोमेट्रिक ई-केवायसी करून देतील. त्यांची फी त्यांना द्यावी लागेल. 30 रुपये किंवा 40 रुपये घेतील.
सोयाबीन कापूस अनुदान साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
सोयाबीन कापूस खरीप अनुदान 2023 ई-केवायसी करण्याकरिता खालील कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहेत:
अनुक्रमांक | आवश्यक कागदपत्रे |
---|---|
1 | शेतकऱ्याचे आधार कार्ड (अपडेटेड आधार) |
2 | आधारशी लिंक असलेला चालू मोबाईल क्रमांक (OTP साठी आवश्यक) |
3 | बायोमेट्रिक Biometric मशीनने ई-केवायसी करायची असेल तर स्वतः शेतकरी असणे आवश्यक आहे |
सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होतील.
राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे काल कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या भाषणात श्री अजित पवार यांनी माहिती दिली. या योजनेसाठी सुमारे 96 लाख शेतकरी पात्र आहेत. 68 लाख शेतकऱ्यांची कृषी विभागाने पडताळणी पूर्ण केली आहे.
65 लाख शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात DBT च्या माध्यमातून 30 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजे आज पहिला भरणा करण्यात येणार आहे. आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात हे लवकरच रक्कम पाठवण्यात येईल.
तुम्हाला ई-केवायसी किंवा अर्ज करत असताना काही अडचण येत असेल तर किंवा या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही सरकारने दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा जेणेकरून तुमच्या प्रश्नाचे निराकरण होईल.
अशी घ्या काळजी जेणेकरून तुम्ही अनुदानापासून वंचित राहणार नाही.
टीप 1: लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे अपडेटेड हवे, म्हणजे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, आणि जन्मतारीख हे आधार कार्डमध्ये असावे.
टीप 2: OTP हा तुमच्या आधार संलग्न नंबरवर पाठवला जातो. म्हणून KYC करायला जाताना, मोबाईल सोबत न्या. आणि खात्री करून घ्या की त्यात रिचार्ज आहे का, जेणेकरून तुम्हाला सहज OTP मिळेल.
टीप 3: बायोमेट्रिक (Biometric) मशीनने ई-केवायसी करताना काळजी घ्या, तुमची बोट साफ हवी. नाहीतर मशीन तुमचे बोट डिटेक्ट करत नाही आणि तुम्हाला ई-केवायसी करायला त्रास होईल.
टीप 4: ई-केवायसी केल्यानंतर तुम्ही तुमची माहिती आवश्य चेक करा. खात्री करून घ्या की केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे की नाही.
टीप 5: तुमचं आधार कार्ड हे बँकेशी संलग्न आहे की नाही, तपासून घेणे. नसेल तर बँकेत जाऊन खात्याची ई-केवायसी करून घेणे. जेणेकरून तुम्ही मिळणाऱ्या लाभांपासून वंचित राहू शकणार नाही.
हे देखील वाचा – रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती |
हेल्पलाइन नंबर
तुम्हाला काही समस्या असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. – 022- 6131 6401
सोयाबीन आणि कापूस अनुदान FAQ’s
प्रश्न 1: सोयाबीन आणि कापूस अनुदान केव्हा घोषित झाले?
उत्तर: सोयाबीन आणि कापूस अनुदान हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्प बजेटमध्ये 05 जुलै 2024 रोजी घोषित केले.
प्रश्न 2: सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपासून जमा होणार आहे?
उत्तर: 30 सप्टेंबर 2024 पासून अनुदान वाटपाची सुरुवात होणार आहे. अनुदान हे DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
प्रश्न 3: कापूस आणि सोयाबीनसाठी ई-केवायसी करण्याचे प्रकार कोणते?
उत्तर: शेतकरी बांधव सोयाबीन आणि कापूस अनुदान मिळवण्यासाठी दोन प्रकारे E-KYC करू शकतात, पहिला पर्याय मोबाईल क्रमांकावर OTP मिळवून आणि दुसरा पर्याय बायोमेट्रिक ( Biometric machine)
प्रश्न 4: अनुदानासाठी कोण पात्र असणार आहे?
उत्तर: सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी या अनुदानाचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
प्रश्न 5: सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी किती हेक्टर शेतीची अट आहे?
उत्तर: महाराष्ट्र सरकारने सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी 2 हेक्टर शेतीची अट ठेवली आहे.
प्रश्न 6: सोयाबीन आणि कापूस अनुदान देण्यामागचे कारण काय?
उत्तर: राज्यात मागच्या वर्षी म्हणजे २०२३ साली शेतकरी बांधवांकडून सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कमी भावात सोयाबीन आणि कापूस खरेदी केली. याचे नुकसान शेतकरी वर्गाला भोगावे लागले, म्हणून सरकारने सोयाबीन आणि कापूससाठी अनुदान घोषित केले.