प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही भारत सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली योजना आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रु. आर्थिक लाभ दिला जातो. योजनेत पात्र सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबाना वर्षाला 6,000 रु. ही रक्कम तीन समान टप्यात आणि प्रत्येक चार महिन्यांनी 2,000 रु. दिली जातात.
पीएम किसान योजनेचे उद्दिष्ट । प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचे उद्दिष्ट
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती आणि शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशात शेतकरी समुदाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याच्या अभावी किंवा कधी कधी जास्त पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
देशातील शहरी आणि ग्रामीण भागात सामाजिक आणि आर्थिक असमानतेमुळे, शेतकरी वर्गाला अनेक आर्थिक संघर्ष करावा लागत आहे. स्वातंत्र्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकरी समुदायाला उन्नत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.
भारत सरकारने 2018 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली आणि आता पर्यंत या योजनेमार्फत करोडो शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा झाला आहे.
आता पर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून डायरेक्ट आधार लिंक बँक खात्यात पैसा जमा करण्यात आले आहेत. भारत सरकारचे लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने नवीन नियमावली आणि काही नवीन कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. या योग्यता पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे.
अनुक्रमांक | योजनेसाठी पात्रता |
---|---|
1 | लहान आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. |
2 | शेतकरी कुटुंबाकडे शेतीयोग्य जमीन असलेले सर्व शेतकरी बांधव या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतात. |
3 | लाभार्थी शेतकरी हा भारतीय नागरिक असावा. |
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
स्व:ता पीएम किसान पोर्टलवर फॉर्म भरत असणार, खाली दिलेले कागदपत्र हैं तुम्हाला अपलोड करावे लागतील. पाहू या कोण कोणते कागदपत्र या योजनेच्या पात्रतेसाठी लागणार आहेत
1. मागील तीन महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सही आणि शिक्का असलेला 7/12 उतारा असणे आवश्यक आहे.
2. जमीन नोंदणीचा फेरफार (धारणा 01/02/2019 पूर्वी लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. किंवा अपवाद, वारसा हक्काने मिळालेली जमीन असेल त्या साठी दुसरे कागदपत्र लागू शकते.)
3. 2019 नंतर जमीन विकत घेतली असेल तर ते लाभ घेऊ शकत नाही.
4. वारस नोंद फेरफार – 01/02/2019 नंतर मयत नावावरून जमीन वारस म्हणून आली असेल तर, तशी फेरफार सुद्धा द्यावी लागेल.
5. लाभार्थी शेतकरी, त्याची पत्नी आणि 18 वर्षांखालील अपत्यांचे आधारकार्ड (हे सर्व एका पानावर स्कॅन करावीत) पोर्टलवर अपलोड केलेली माहिती कृषी अधिकाऱ्यांकडून तपासली जाईल आणि पात्र शेतकऱ्यांना या योजनेसाठी अँप्रोव्ह केले जाईल.
6. आधार कार्डशी लिंक बँक पासबुक.
7. स्व:ताचा पासपोर्ट साइज फोटो.
पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा लाभ घेण्यासाठी PM Kisan पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. चला पाहू या अर्ज कसा करावा.
पाऊल 1: पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईटची लिंक – येथे क्लिक करा
पाऊल 2: पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला “New Farmer Registration” या बटणावर क्लिक करायचं आहे.
पाऊल 3: तुमच्या समोर एक नवीन पान उघडेल. तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि राज्य विचारलं जाईल.
पाऊल 4: माहिती चुकीची नसावी. नंतर कॅप्चा भरून “Get OTP” वर क्लिक करायच आहे.
पाऊल 5: तुम्ही दिलेल्या मोबाइलवर OTP येईल. तो भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
पाऊल 6: तुम्हाला विचारले जाईल रेजिस्ट्रेशन चालू ठेवायचं आहे का. तुम्हाला “Yes” पर्यायावर क्लिक करायचं आहे.
पाऊल 7: तुमच्या समोर आता नवीन फॉर्म ओपन होईल. त्यात सर्व माहिती भरायची आहे आणि लागणारे सर्व कागदपत्र अपलोड करायची आहेत.
अनुक्रमांक | भरायची माहिती आणि लागणारी कागदपत्रे |
---|---|
1 | आधार क्रमांक |
2 | मोबाईल क्रमांक |
3 | राज्य, जिल्हा, ब्लॉक, गाव |
4 | बँक खातेची माहिती |
5 | जमिनीची माहिती |
6 | आवश्यक असणारी सर्व जमिनीची आणि स्वतःची कागदपत्र |
7 | आधार कार्ड |
8 | बँक पासबुक |
9 | स्कॅन करून अपलोड करणे |
पाऊल 8: नंतर खाली दिलेल्या “Submit” बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे.
पाऊल 9: नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक “किसान ID” दिला जाईल.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत नोंदणी नंतर
नवीन नोंदणी नंतर तुमचा फॉर्म हा कृषी विभागा तर्फे फेरफार केला जाईल. सर्व माहिती आणि जमा केलेली कागदपत्र बरोबर असतील तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजने अंतर्गत हफ्ते भेटायला चालू होतील.
जर तुमचा फॉर्म हा कृषी विभागा तर्फे नाकारला गेला तर तुम्ही CSC सेंटर ला किव्हा कृषी अधिकाऱ्यांना भेटून पुन्हा फॉर्म ची तपासणी करून. तुम्ही अँप्रोव्ह घेऊ शकता.
हे देखील वाचा – रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती |
अशी घ्या काळजी जेणेकरून तुमचा फॉर्म बाद होणार नाही.
टीप 1: शेतकऱ्याने स्वतःच्या आणि घरातील सदस्यांचे आधार कार्ड अपडेटेड ठेवावे, आणि एका पानावर सर्व आधार कार्ड प्रिंट करून घ्यावे.
टीप 2: ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांचे स्वतःचा मोबाईल नंबर वापरणे. जेणेकरून पुढे जाऊन फॉर्म आणि पेमेंट स्टेटस सहज चेक करू शकतो.
टीप 3: 7/12 उतारा हा जास्त जुना नसावा. खात्री करून घ्या की उतारा हा मागील ३ महिन्यातील आहे कीनाही; नसेल तर नवीन उतारा काढून घेणे.
टीप 4: कागदपत्र ही स्पष्ट दिसणारी हवी. जेणेकरून अधिकाऱ्यांकडून पडताळणी करताना बाद होणार नाही.
टीप 5: फॉर्म भरताना नवीन वारस नोंद फेरफार काढून घेणे.
टीप 6: तुम्हाला योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर कृषी अधिकाऱ्यांना भेटून, तुमच्या प्रश्नांचे निवारण करून घ्या.
FAQs
प्रश्न 1: PM किसान सम्मान निधी योजना कधी सुरू करण्यात आली?
उत्तर: केंद्र सरकारने 2018 मध्ये लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली.
प्रश्न 2: 2019 नंतर शेती विकत घेतलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील का?
उत्तर: केंद्र सरकारने योजनेच्या नियमानमध्ये काही बदल केले आहेत. त्या अनुसार नवीन शेती विकत घेतलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
प्रश्न 3: योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC करणे बंधनकारक आहे का?
उत्तर: हो, योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC करणे बंधनकारक आहे.
प्रश्न 4: PM किसान सम्मान निधी योजनेत किती लाभ दिला जातो?
उत्तर: PM किसान सम्मान निधी योजनेत 6,000 रुपये वर्षाला आणि प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपये असे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
प्रश्न 5: पीएम किसान 19वा हप्ता कधी येणार?
उत्तर: PM किसान सम्मान निधी योजनेत 19वा हप्ता 2025 मध्ये येईल.
प्रश्न 6: PM किसान सम्मान निधी योजनेत मोबाईल क्रमांक बदलू शकतो का?
उत्तर: हो “Update Mobile Number” या बॉक्सवर क्लिक करून तुम्ही तुमचा जुना मोबाईल क्रमांक बदलू शकता.