मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज । अर्ज करण्यासाठी नवीन अधिकृत वेबसाईट सुरु

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” (Magel Tyala Solar Pump Yojana) काढली आहे. यात सर्वसाधारण शेतकऱ्यांना 10 टक्के तर अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम भरून या योजनेचा लाभ हा घेता येईल. या योजनेत शासनाने 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी पंप शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना विषयी | Details about Magel Tyala Solar Pump Yojana

आपल्या सर्वांना माहिती आहे अजूनही भारतात कोळश्यावर वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे भारतात पुरेशी वीज निर्मित होत नाही आणि याचा सर्वात जास्त नुकसान हे शेतकरी वर्गाचे होते. महाराष्ट्रात काही शेतकरी असे आहेत, त्यांच्या विहिरीला किंवा बोरवेलला खूप पाणी आहे.

पण विजेच्या तुटवड्यामुळे त्यांना त्या पाण्याचा उपयोग होत नाही आणि त्यांचा उत्पन्नात घट होत आहे. म्हणून सरकारने 2015 पासून सौर ऊर्जेचे महत्त्व समजून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने “मागेल त्याला सोलार पंप” (Magel Tyala Solar Pump) ह्या योजनेला सुरवात केली.

या आधी हे शासनाने यशस्वीरित्या अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवल्या आहेत. या योजनेत शासनाने 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी पंप शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासोबत तुम्हाला सरकारकडून ठराविक कालावधीसाठी दुरुस्तीची हमी आणि शेतकऱ्याला इन्शुरन्स दिला जाणार आहे. मागेल त्याला सोलार पंप (Magel Tyala Solar Pump) योजनेत शेतकऱ्याला अनुदान दिले जाणार आहे.

सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10 टक्के तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 5 टक्के रक्कम भरून या योजनेचा लाभ हा घेता येईल.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेनुसार तुमच्याकडे 2.5 एकरापर्यंत जमीन असेल तर तुम्हाला 3 एचपी, 2.5 एकरापेक्षा जास्त आणि 5 एकरा पर्यंत असेल तर तुम्हाला 5 एचपी आणि 5 एकरापर्यंत जास्त जमीन असेल तर तुम्हाला 7.5 एचपी पंप तुम्हाला दिला जाईल.

मागेल त्याला सोलार पंप योजनेविषयी सविस्तर माहिती पाहू या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील, योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये, कोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कसा करायचा.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाचे मुख्य वैशिष्ट्ये । Magel Tyala Solar Pump Yojaneche mukhya veshisthe

1. शेतकऱ्यांना सिंचनासाठी त्यांची स्वतंत्र आणि शाश्वत योजना उपलब्ध करून देणे.

2. सर्वसाधारण शेतकऱ्यांना 10 टक्के तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंप.

3. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदान म्हणून भरेल.

4. जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 3 ते 7.5 एचपी पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाईल.

5. शेतकऱ्यांना वीजबिल आणि लोडशेडिंगची चिंता नाही.

6. सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा तसेच शेतकऱ्यांना विमा आणि दुरुस्तीची हमी सरकार देणार आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Tyala Solar Pump) या योजनेअंतर्गत पात्रता

magel tyala solar pump yojana patrata

अनुक्रमांकयोजनेअंतर्गत पात्रता
1अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी कोणत्याही सौर कृषी पंपाचा लाभ घेतलेला नसावा.
3अर्जदाराकडे स्वतःच्या नावे किंवा भागीदारी पद्धतीने जमीन असणे आवश्यक आहे.
4अर्जदाराकडे सामायिक क्षेत्र असलेली जमीन असल्यास त्यामधील असणारे भोगवाटेदार यांचे संमती पत्र असणे आवश्यक आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Tyala Solar Pump) या योजनेअंतर्गत निवड.

अनुक्रमांकयोजनेअंतर्गत निवड
12.5 एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यास 3 एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप, 2.5 ते 5 एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यास 5 एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप, 5 एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यास 7.5 एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप दिला जाईल.
2शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीचे बोअरवेल, विहिरी, नद्या इत्यादींमध्ये पाण्याचे स्त्रोत असल्याची खात्री महावितरणकडून केली जाईल.
3अर्जदाराकडे स्वतःच्या नावे किंवा भागीदारी पद्धतीने जमीन असणे आवश्यक आहे.
4तसेच शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीचे किंवा सामुदायिक विहिरी, बोअरवेल, नद्या इत्यादींमध्ये पाण्याचे स्त्रोत असल्यास शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतील.

मागेल त्याला सोलर पंप ऑनलाईन अर्ज | Magel tyala krushi pump yojana online registration

Magel Tyala Solar Pump Yojana । मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाईन अर्ज

पाऊल 1: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अधिकृत पोर्टलवर जा येथे क्लिक करा

पाऊल 2: पोर्टलवर “योजनेची माहिती” या मेनूवर जाऊन “अर्ज करा” बटनावर क्लिक करा. तुमच्या समोर नवीन “विंडो (Window)” उघडेल.

पाऊल 3: अर्जदाराने त्याच्या सोईनुसार “भाषा” निवडून घ्यायची आहे.

पाऊल 4: तुम्ही या आधी महावितरणमध्ये वीजपुरवठा मिळवण्यासाठी पैशाचा भरणा केला असेल व वीज जोडणी प्रलंबित असेल, तर त्यांनी पैसे भरून प्रलंबित कृषीपंप वीज जोडणी ग्राहक तपशील भरणे.

पाऊल 5: अर्जदाराने त्याची वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील भरणे.

पाऊल 6: अर्जदाराने त्याचा रहिवासी पत्ता व ठिकाण अचूक भरणे.

पाऊल 7: अर्जदाराने त्याच्या मालकीच्या किंवा सामुदायिक जलस्तोत्र आणि सिंचनाची माहिती देणे.

पाऊल 8: कृषी तपशील – अर्जदाराने विचारलेली संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे: शेताचे संपूर्ण क्षेत्रफळ, पिकाचा प्रकार, सिंचन पद्धत, शेतात वापरली जाणारी तंत्रज्ञान, शेतजमिनीचा नकाशा किंवा मोजणी कागदपत्र.

पाऊल 9: विद्यमान पंप तपशील – शेतासाठी वापरण्यात येणाऱ्या विद्यमान पंपाची माहिती. जसे की पंपाचा ब्रँड, पंप किती क्षमतेचा आहे, सध्याची स्थिती, पाण्याचा दाब उचलण्याची क्षमता, त्याचा वापर इत्यादी.

पाऊल 10: आवश्यक पंप तपशील – तुमच्या शेताच्या आवश्यकतेनुसार नवीन पंपाची माहिती, जसे की पंपाची क्षमता, पंपाचा वापर, वीज किंवा इंधन प्रकार इत्यादी.

पाऊल 11: बँक तपशील – (बँक खाते क्रमांक,बँकेचे नाव आणि शाखा, IFSC कोड, तुमच्या खात्याचा प्रकार, तुमच्या बँकेचा पत्ता विचारलेली संपूर्ण माहिती भरली पाहिजे).

पाऊल 12: घोषणापत्र – यात अर्जदाराची विचारलेली माहिती आणि सही किंवा अंगठा त्या सोबत तारीख, त्या सोबत दिलेली अटी आणि नियम मान्य असणे.

पाऊल 13: कागदपत्रे अपलोड करा (पीडीएफ फाइल अपलोड करा कमाल आकार 500 केबी)

पाऊल 14: शेवटी अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करायचे आहे. नंतर एक पॉपअप (Popup) दिसेल, Ok बटणावर क्लिक करायचे आहे.

पाऊल 15: आपण भरलेली माहिती बरोबर आणि खरी आहे का असे विचारले असता Ok बटणावर क्लिक करा.

पाऊल 16: रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लाभार्थी क्रमांक आणि इतर माहिती दिसेल. ती तुम्ही सेव्ह (Save) करून ठेवा.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे । Magel Tyala Solar Pump Yojanesathi Lagnare Documents

magel tyala solar pump yojana documents

मागेल त्याला सौर कृषी पंप (Magel Tyala Solar Pump) योजनेसाठी अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

अनुक्रमांकखालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे
1आधार कार्डाची छायाप्रत सादर करणे बंधनकारक आहे. यामध्ये तुमचा आधार क्रमांक, संपूर्ण जन्मतारीख, पत्ता आणि फोटो स्पष्ट दिसणे गरजेचे आहे.
27/12 उतारा (विहीर / कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक)
3जमिनीचे पुरावा – जमिनीवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करेल असा कागद असावा. सातबारा उतारा, मालकी हक्काचा कागद किंवा सरकारी अधिकृत कागद.
4अनुसुचित जाती/जमातीचे प्रमाणपत्र (SC/ST लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र), हे प्रमाणपत्र अधिकृत विभागाने जारी केलेले असावे. त्यात त्या विभागाचा शिक्का असणे आवश्यक आहे.
5सामायिक जमीन असल्यास भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र रु. 200/- च्या मुद्रांक कागद आवश्यक आहे
6अर्जदाराने नवीन पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो सादर करावा. फोटो स्पष्ट काढलेला असावा.
7मोबाईल नंबर – वैयक्तिक मोबाईल नंबर द्या. या नंबरवर संबंधित सूचना आणि तपशील पाठवण्यात येतील.
8बँकेचे पासबुक (नाव, खाते नंबर आणि बँक शाखेची माहिती असणे) किंवा रद्द केलेला धनादेश (Cancelled Cheque) प्रत, दोघांपैकी एक आणि त्यात नाव आणि खाते क्रमांक बरोबर असणे.
9सध्या राहत असलेल्या पत्ता सिद्ध होईल जसे की वीज बिल, रेशन कार्ड, पाणीपट्टी बिल किंवा इतर सरकार अधिकृत कागदपत्र

ह्या सर्व त्रुटी तपासून घ्या जेणेकरून तुम्ही अनुदानापासून वंचित राहणार नाही

टीप 1: खात्री करून घ्या की तुमच्या 7/12 उताऱ्यात पाण्याच्या स्रोताविषयी नोंद आहे की नाही. नोंद नसेल तर तलाठी कार्यालयात जाऊन नोंद करून घेणे.

टीप 2: 200 रुपयांचा मुद्रांक कागद चालेल की नाही, एकदा कार्यालयात जाऊन चौकशी करून घेणे. कारण महाराष्ट्रात 100, 200 रुपयांचा मुद्रांक बंद करून 500 रुपयांचा मुद्रांक चालू केला आहे.

टीप 3: कागदपत्रे अपलोड करण्याअगोदर एकदा सत्यापित करून घ्या. आणि खात्री करून घ्या की प्रत्येक कागदाचा आकार 500 KB पर्यंत आहे की नाही.

टीप 4: पत्ता पुरावा देताना एकदा नक्की तपासा, जेणेकरून तपासासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकर पत्ता मिळेल.

टीप 5: तुम्हाला सवलत घ्यायची असेल तर सांगितलेली कागदपत्रे ही स्पष्ट आणि बरोबर अपलोड करावीत.

टीप 6: तुमचे बँक खाते आधार संलग्न आहे की नाही, तपासून घ्या. नसेल तर बँकेत जाऊन आधार संलग्न करून घ्या.

संपर्क तपशील

शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना विषयी कोणतीही माहिती मिळवायची असेल आणि योजनेविषयी काही प्रश्न असतील, तर तुम्ही खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करू शकता आणि तुमच्या समस्यांचे निवारण करू शकता.

  • MSEDCL हेल्पलाइन क्रमांक – 18002123435 / 18002333435
  • राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक – 1912 / 19120

FAQs : योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: महाराष्ट्रात 2024 मध्ये सौर पंप सबसिडी किती आहे?
उत्तर: SC/ST शेतकरी पंपाच्या किमतीच्या फक्त 5% भरावी लागेल, तर सामान्य श्रेणीतील शेतकऱ्यांनी 10% भरावे लागेल.

प्रश्न 2: सोलर वॉटर पंपचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो?
उत्तर: सोलर वॉटर पंपचा वापर केल्याने शेतकऱ्यांची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढेल.

प्रश्न 3: या योजनेत शेतकऱ्यांना किती एचपी पंप देण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर: या योजनेत शासनाने 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी पंप शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment