मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुण युवांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” या योजनेमार्फत युवकांना मोफत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेमुळे युवकांना थेट कंपनीमध्ये काम शिकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेमार्फत सरकार युवांना मासिक आर्थिक सहाय्यसुद्धा देणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 4 लाख 5 हजार 626 तरुणांना रोजगार प्रशिक्षण देण्याचं सरकारच लक्ष आहे.
काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? । योजनेसाठी किती कोटींची तरतूद आहे?
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana) महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांसाठी 27 जून 2024 रोजी 2024-25 या वर्षाच्या पुरवणी अर्थसंकल्पात सुरु केली. या योजनेसाठी सरकारने 5 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 4 लाख 5 हजार 626 रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं लक्ष आहे. या योजनेमार्फत युवकांना 6,000 ते 10,000 पर्यंत प्रतिमाह विद्यावेतन देण्याचं निश्चित केलं आहे. लाभार्थ्यांचं किमान वय हे 18 आणि कमाल वय हे 35 असावे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनुसार 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि तरुणांना 6 हजार, आयटीआय आणि पदविकाधारक विद्यार्थी आणि तरुणांना 8 हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी आणि तरुणांना 10 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेसाठी आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त अर्ज सरकारकडे आले आहेत आणि 10 हजारापेक्षा जास्त खाजगी व शासकीय आस्थापनांनी नाव नोंदणी केली आहे.
योजनेसाठी लाभार्थी पात्रता
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी लाभार्थी पात्रता (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana).
अनुक्रमांक | योजनेसाठी पात्रता |
---|---|
1 | ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. म्हणून लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. |
2 | या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे किमान वय 18 आणि कमाल वय 35 असणे आवश्यक आहे. |
3 | लाभार्थ्यांची किमान शैक्षणिक पात्रता ही 12 पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असावी. |
4 | या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे अपडेटेड आधार कार्ड असणे आवश्यक आहे. |
5 | लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न असावे. |
6 | लाभार्थ्यांची कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. |
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Important Documents For Chief Minister Youth Work Training Scheme)
अनुक्रमांक | आवश्यक कागदपत्रे |
---|---|
1 | आधार कार्ड असावे. लाभार्थ्यांकडे अपडेटेड आधार कार्ड पाहिजे. |
2 | आधार लिंक बँक खाते. म्हणजे ई-केवायसी केलेली पाहिजे. |
3 | 12वी पास / आयटीआय / पदविका / पदवीधर / पदव्युत्तर प्रमाणपत्र. |
4 | कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेला नंबर. |
योजनेचा वेतन लाभ कसा मिळणार
योजनेचा वेतन लाभ हा सदर लाभार्थाच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.
अनुक्रमांक | वेतन लाभ |
---|---|
1 | 12 वी पास झालेल्या लाभार्थ्यांना 6,000 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे. |
2 | आयटीआय/पदविका लाभार्थ्याना 8,000 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे. |
3 | पदवीधर/पदव्युत्तर लाभार्थ्याना 10,000 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे. |
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी
पाऊल 1: आधी लाभार्थ्याने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर जावे. येथे क्लिक करा
पाऊल 2: तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल. होम पेजवर ( Job Seeker Find a Job ) / नोकरी शोधा लिंक किंवा बटण दिसेल तिथे क्लिक करा.
पाऊल 3: तुम्हाला उजव्या बाजूला “Jobseeker / CMYKPY Training Login” असे दिसेल.
पाऊल 4: आधी तुम्ही या पोर्टलवर रेजिस्ट्रेशन केले असेल तर, लॉगिन आयडी (username) आणि पासवर्ड (password) टाकून लॉगिन करून प्रत्येक टॅबची अचूक माहिती भरून (अपडेट) करून “SAVE” करावी.
पाऊल 5: तुम्ही या पोर्टलवर नवीन असाल तर, “नोंदणी” या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन नोकरी साधक ( New Job Seeker) नोंदणी फॉर्म ओपन होईल.
पाऊल 6: फॉर्म ओपन झाल्यानंतर आधार कार्डवरील माहितीशी सुसंगत माहिती काळजीपूर्वक आवश्यक माहिती भरायची आहे.
अनुक्रमांक | भरावाची माहिती |
---|---|
1 | पहिले नाव |
2 | वडीलांचे नाव |
3 | आडनाव |
4 | जन्म दिनांक |
5 | आधार क्रमांक |
6 | मोबाईल नंबर |
इत्यादी माहिती भरून कॅप्चा भरून पुढील (NEXT) बटनावर क्लिक करा.
पाऊल 7: आपल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो भरून आपण आपला पुढील नोंदणी फॉर्म भरायचा आहे.
अनुक्रमांक | भरावाची माहिती |
---|---|
1 | आईचे नाव |
2 | पत्ता |
3 | धर्म, जात |
4 | वैवािहक स्थिति |
5 | शैक्षणिक पात्रता |
6 | मोबाईल नंबर |
7 | ई-मेल आयडी टाकून स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे. |
पाऊल 8: फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला एक संदेश येईल, त्यात आपल्याला नोंदणी क्रमांक व पासवर्ड भेटेल.
पाऊल 9: मिळालेल्या नोंदणी क्रमांक / आधार क्रमांक टाकून आपण तयार केलेला पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
पाऊल 10: प्रोफाइलमध्ये “Edit Button” बटनावर क्लिक करून उर्वरित माहिती भरावी.
अनुक्रमांक | भरावाची माहिती |
---|---|
1 | वैयक्तिक माहिती |
2 | शैक्षणिक माहिती |
3 | अनुभवाचा तपशील |
4 | बँक खाते तपशील अपडेट करावे |
पाऊल 11: शेवटी आपणास दस्तऐवज (Document) अपलोड करावयाची आहेत.
अनुक्रमांक | दस्तऐवज (Document) |
---|---|
1 | रहिवासी दाखला ( Domicile Certificate ) |
2 | शैक्षणिक कागतपत्र |
3 | कॅन्सल चेक / पासबुक पेज (आधार लिंक बँक खात) इ. |
कागतपत्र अपलोड केल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल. अशा प्रकारे लाभार्थी नोंदणी करू शकतात.
हे देखील वाचा – प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना : इंटर्नशिप योजने विषयी माहिती |
संपर्क तपशील
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेविषयी काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता – 18001208040
टीप
ऑनलाईन अर्ज करताना अधिक माहिती आवश्यक असल्यास आपण जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयाशी संपर्क करावा. वर दिलेल्या क्रमांकावर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता.
FAQs : योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी किती महिने राहणार आहे?
उत्तर: योजनेचा कालावधी 6 महिन्यांसाठी असेल.
प्रश्न 2: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत किती स्टायपेंड मिळेल?
उत्तर: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 6,000 ते 10,000 रुपये इतका स्टायपेंड मिळणार आहे.
प्रश्न 3: युवा कार्य प्रशिक्षण योजना कधी चालू करण्यात आली?
उत्तर: महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांसाठी 27 जून 2024 रोजी 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पात ही योजना सुरू केली.
प्रश्न 4: युवा कार्य प्रशिक्षण योजनेत वयाची अट किती आहे?
उत्तर: लाभार्थीचे वय 18 आणि कमाल वय 35 असावे.
प्रश्न 5: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा फॉर्म भरायला चालू झालाय का?
उत्तर: होय, योजनेचा फॉर्म भरणे चालू झालंय. “https://rojgar.mahaswayam.gov.in/” या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरू शकता.
प्रश्न 6: दुसऱ्या राज्याचे विद्यार्थी प्रशिक्षण योजनेचा लाभ घेऊ शकता का?
उत्तर: नाही, ही योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे. म्हणून या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्याचे विद्यार्थी घेऊ शकतात.
प्रश्न 7: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्याचे मुख्य उद्दीष्ट काय आहे?
उत्तर: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्याचे मुख्य उद्दीष्ट हे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी योग्य बनवणे जेणेकरून युवांना लवकर रोजगार मिळेल.
प्रश्न 8: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ऑफलाइन फॉर्म भरू शकतो का?
उत्तर: नाही, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने अधिकृत वेबपोर्टल तयार केले आहे. लाभार्थी हा अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म सबमिट करू शकतो. ऑफलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध नाही.