तरुणांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ देत आहे बिनव्याजी 15 लाखांचं कर्ज. जेणेकरून तरुण हा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो आणि समाजाला एक चांगला संदेश देऊन राज्याच्या आणि देशाच्या तरुणांसाठी प्रेरणा देणारा असेल. जेणेकरून गरीब घरातून येणारे तरुण स्वतःचे अस्तित्व बनवू शकतील. चला तर पाहू या सविस्तर माहिती.
का चालू केली अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना (Annasaheb Patil Karj Yojana)
राज्यात प्रत्येक वर्षी खूप सारे तरुण शिक्षण पूर्ण करतात. त्यातले काही तरुण त्यांच्या घरच्या व्यवसायाकडे वळतात, तर काही तरुण नोकरीला लागतात. बाकी तरुण घरच्या आर्थिक परिस्थिती पाहून त्यांच्या मनातील व्यवसाय करण्याच्या कल्पना ह्या कल्पनाच ठेवून घरासाठी धावपड करू लागतात.
पण इच्छा नसून हे फक्त घरासाठी त्यांना नोकरी करावी लागते. नाहीतर राज्याच्या बहुतांश तरुणांकडे व्यवसायाचे नवनवीन कल्पना असतात, पण आर्थिक परिस्थिती आणि भांडवलामुळे त्यांना परिस्थितीच्या पुढे जाता येत नाही. आणि जे तरुण त्यांच्या पूर्वजांच्या व्यवसायाकडे जातात, त्यांनाही त्यात बदल हवा असतो.
मग बदल आणि नवा व्यवसाय आला म्हणजे त्यासाठी लागणारे भांडवल, मग तरुण त्याच्या कल्पना घेऊन बँकांकडे जातो आणि त्यांची नियम आणि अटी शर्ती पाहून तरुण निराश होतो. कारण त्याच्याकडे कौशल्य असूनसुद्धा फक्त भांडवलामुळे त्याला स्वतःला सिद्ध करता येत नाही.
पण आता असं होणार नाही, महाराष्ट्र सरकारने २७ नोव्हेंबर १९९८ साली अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेची (Annasaheb Patil Karj Yojana) स्थापना केली. स्वतःचा व्यवसाय चालू करणाऱ्या आणि जे तरुण आधीपासून व्यवसाय करत असतील अशा तरुणांसाठी योजनेतून भक्कम आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. या योजनेत तरुणांना बिनव्याजी १५ लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे.
जेणेकरून राज्यातील गरीब तरुणही त्याच्या व्यवसायासाठी एक उंच भरारी घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत अण्णासाहेब पाटील महामंडळ या कर्जाचं व्याज भरणार आहे. म्हणून तरुणानं व्यवसाय करताना फक्त मुद्दल फेडण्याची चिंता असणार आहे.
पण साहजिकच तुम्हाला प्रश्न पडले असतील. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील, त्याची नेमकी प्रक्रिया कशी आहे, योजनेमधून कर्ज मिळत कसे, हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कुठे जावे लागेल. तर चिंता करू नका, तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही सुद्धा या कर्जासाठी अर्ज करू शकता.
योजनेसाठी पात्रता आणि अटी
1. योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे किमान वय १८ वर्ष पूर्ण पाहिजे. अर्जदार पुरुष असेल तर कमाल वय ५० वर्ष, आणि अर्जदार महिला असेल तर त्या साठी कमाल वय ५५ वर्ष असावं.
3. अर्जदाराने अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला नको.
4. अर्जदाराने हा आधीपासून व्यवसाय करत असेल तर त्याच्याजवळ त्याच्या व्यवसायाचे कागदपत्र असणे आवश्यक आहे (उद्योग आधार आणि शॉप ॲक्ट लायसन्स).
5. एका कुटुंबातून एकच अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
6. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपयांवर नको.
7. अर्जदाराने दुसऱ्या कोणत्या बँकेचं कर्ज घेतलं असेल तर तुम्ही अर्ज नाही करू शकत. तुमचं कर्ज व्यवस्थित रित्या भरले असेल म्हणजे पूर्ण केलं असेल, तरच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता.
8. व्यावसायिक नागरिक जे गटागटाच्या माध्यमातून अर्ज करत असतील, तर अशा अर्जदारांचे किमान शिक्षण हे १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
9. दिव्यांगांसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी अपंग प्रमाणपत्र लागेल.
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1. अर्जदाराकडे अपडेटेड आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
3. अर्जदाराकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
4. अर्जदार जिथे वास्तव्यासाठी आहे, तिथला रहिवाशी दाखल.
5. वार्षिक उत्पन्न दाखल.
6. पासपोर्ट आकाराचे फोटो.
7. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणाऱ्या तुमच्या खात्याची सर्व माहिती.
8. मोबाईल नंबर, ई-मेल आयडी.
9. तुमच्या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती असणारा अहवाल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा | Annasaheb Patil Loan Apply Online
स्टेप 1: महाराष्ट्र सरकारने अधिकृत केलेल्या वेबसाईटवर जावे. – येथे क्लिक करा
स्टेप 2: तुमचं वेबपोर्टलवर अकाउंट नसेल तर आधी अकाउंट बनवून घ्या.
स्टेप 3: युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा भरून डॅशबोर्ड उघडून घेणे.
स्टेप 4: आता डॅशबॉर्डवर तुम्हाला “View Profile” नावाचं बटण दिसेल. त्या बटनावर क्लिक करून तुमची प्रोफाइल उघडून घ्या.
स्टेप 5: तुम्हाला आता विचारलेली संपूर्ण माहिती खात्री करून आणि नचुकता भरून घ्यायची आहे आणि सांगितलेले कागदपत्र अपलोड करायचे आहे.
स्टेप 6: माहिती भरली गेल्यानंतर खाली तुम्हाला उपलब्ध योजनांविषयी माहिती दिली जाईल.
स्टेप 7: संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुम्हाला घ्यावयाच्या योजनेसमोरील लागू करा स्तंभातील “पहा” बटनावर क्लिक करा.
स्टेप 8: पुढच्या स्टेपमध्ये योजनेविषयी सर्व माहिती, पात्रता आणि अटी दिसतील.
स्टेप 9: नंतर शेवटच्या “अर्ज करण्यासाठी” टॅबवर क्लिक करायचे आहे.
स्टेप 10: आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि “लागू करा” बटनावर क्लिक करायचे आहे.
स्टेप 11: आता तुम्हाला तुमच्या 8 लाखांच्या उत्पन्नाबद्दल विचारले जाईल. “Yes” बटनावर क्लिक करून पुढे जा.
स्टेप 12: तुम्ही या कर्जासाठी नवीन असाल तर “Yes” बटनावर क्लिक करायचे आहे.
स्टेप 13: आता तुमच्या समोर नवीन पेज उघडेल, त्यात वैयक्तिक माहिती, निवासी तपशील, कर्ज तपशील, अपलोड हे 4 टॅब दिसतील. आता ते एक एक करून भरून घ्या.
स्टेप 14: वैयक्तिक माहिती ही आधीपासून भरून येईल. त्यात आवश्यक असेल तर बदल करा, नाहीतर पुढे “नीवासी तपशिलावर” क्लिक करा.
स्टेप 15: निवासी पत्ता भरून घ्यायचा आहे. कायम आणि सध्याचा पत्ता सारखा असेल तर खाली दिलेल्या बॉक्समध्ये क्लिक करा.
अनुक्रमांक | निवासी पत्ता |
---|---|
1 | गाव, शहर, तालुका, जिल्हा निवडून घ्या. |
2 | शैक्षणिक माहिती निवडून घ्या. |
3 | तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? असेल तर “Yes” निवडा, नाहीतर “No” निवडा. |
4 | तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर नंबर भरून घ्या. |
5 | तुम्ही दिव्यांग असाल तर “Yes” निवडा, नाहीतर “No” निवडा. |
स्टेप 16: माहिती भरल्यानंतर “अर्ज जतन करा” वर क्लिक करा.
स्टेप 17: आता पुढच्या कर्ज तपशीलामध्ये विचारलेली माहिती अचूक भरून घ्यायची आहे.
अनुक्रमांक | कर्जाबद्दल तपशील |
---|---|
1 | तुमच्या व्यवसायाचे नाव भरा. |
2 | व्यवसायाची श्रेणी निवडून घ्या. |
3 | व्यवसायाची उपश्रेणी निवडून घ्या. |
4 | दिलेल्या श्रेणीमध्ये तुमचा व्यवसाय नसेल तर “Other” निवडा आणि पुढे तुमच्या व्यवसायाची श्रेणी भरून द्या. |
5 | व्यवसायापासून निर्माण होणारी वस्तू काय आहे, भरून द्या. |
6 | ज्या ठिकाणी व्यवसाय आहे तिथला पत्ता भरा. |
7 | तुम्हाला व्यवसायासाठी लागणारी कर्जरक्कम भरा. |
स्टेप 18: माहिती भरल्यानंतर “अर्ज जतन करा” वर क्लिक करा.
स्टेप 19: आता तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवर तुम्ही भरलेल्या अर्जाचा क्रमांक दिसेल. त्याचा फोटो काढून घ्या. तो पुढे लागणार आहे.
स्टेप 20: आता अर्ज क्रमांकावर क्लिक करून पुन्हा कागदपत्र अपलोड करण्यासाठी “अपलोड” या टॅबवर क्लिक करून घेणे.
स्टेप 21: आता तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी तुमच्याकडे असलेली कागदपत्रे अपलोड करायची आहेत. 10 MB खालील आकार असलेले फोटो अपलोड करायचे आहेत. आणि फोटो हे .png, .jpg, .jpeg, .bmp असणे आवश्यक आहे.
लागणारी कागदपत्रे | दिलेली कागदपत्र अपलोड करू शकता |
---|---|
महाराष्ट्रात रहिवासी असल्याचा पुरावा | भाडेकरार, वीज बिल, गॅस सिलेंडर जोडणी, दूरध्वनी बिल, बँकेची पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट. |
आधार कार्ड | आधार कार्डची पुढील आणि मागील असलेली छायाप्रत. |
उत्पन्नाचा दाखला | कुटुंबाचा उत्पन्न दाखला, कुटुंबाचा आयकर भरणा (पती आणि पत्नी दोघांपैकी एक). |
जातीचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला | Caste Certificate, Leaving Certificate. |
प्रकल्प अहवाल | तुमच्या प्रकल्पाविषयी सविस्तर असे Document (Preference PDF format). |
स्व-घोषणा दस्तावेज | प्रिंट काढून त्यात विचारलेली माहिती भरून आणि सही व तारीख टाकून अपलोड करणे. |
स्टेप 22: शेवटी “अर्ज जतन करा” वर एकदा क्लिक करायचे आहे. म्हणजे तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे सेव्ह होतील.
स्टेप 23: सबमिट बटनावर क्लिक करा आणि तुमच्या समोर एक मॉडेल उघडेल, त्यात तुमची माहिती तपासून घ्या.
स्टेप 24: दिसत असलेली माहिती बरोबर असेल तर “I Agree” बटनावर क्लिक करा. आता तुमच्या समोर फॉर्म भरल्याचा क्रमांक दिसेल. नंतर “OK” बटनावर क्लिक करा.
स्टेप 25: तुमच्या फॉर्मचा स्टेटस “Pending” दिसेल. आयोग तुम्ही भरलेली माहिती आणि अपलोड केलेली कागदपत्रे तपासून तुम्हाला मान्यता मिळेल.
अण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना
क्रमांक | योजना |
---|---|
1 | वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) |
2 | गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) |
3 | गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) |
उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा
अण्णासाहेब पाटील महामंडळच्या वेब पोर्टलवर उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा
क्रमांक | उपलब्ध सुविधा यादी |
---|---|
1 | विविध विभागांतील उमेदवारांसाठी महामंडळाची योजना. |
2 | उमेदवाराच्या पात्रतेनुसार योग्य स्वयं रोजगार योजना शोधणे. |
3 | उमेदवारांना स्वयंरोजगार कर्ज अर्ज ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. |
4 | कर्जाची पात्रता, अटी व शर्ती, कर्ज मंजुरी, कर्ज कागदपत्रे इ. माहिती |
5 | ऑनलाइन जमा केलेल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्याची स्थिती पहा. |
6 | वेब पोर्टलवर 250 पेक्षा जास्त नमुना प्रकल्पाची उपलब्धता. |
7 | व्याज देयके मोजण्यासाठी(EMI calculator). |
8 | उमेदवारांच्या समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाइन. |
FAQ’s: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1: अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे?
उत्तर: मराठा समाजातील होतकरू तरुणांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालू असलेल्या व्यवसायाला वाढवण्यासाठी बिनव्याजी कर्ज प्राप्त करून दिले जाते. तरुणांना बँकेतून कर्ज लवकर मिळावे म्हणून योजनेमार्फत LOI दिला जातो.
कर्ज मंजूर झाल्यानंतर या कर्जावरील व्याज हे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ फेडते, तर मुद्दल ही तरुणाला फेडावी लागते. कर्ज घेण्यासाठी तरुणाकडे व्यवसायाची पूर्ण माहिती हवी. या योजनेचा लाभ हा ऑनलाइन पद्धतीने घेता येतो.
प्रश्न 2: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी किती वयोमर्यादा आहे?
उत्तर: योजनेत महिलां आणि पुरुषांसाठी वयोमर्यादा ठरवली आहे. या योजनेत 50 वयोवर्षांपर्यंतचे पुरुष लाभ घेऊ शकतात, तर 55 वयोवर्षांपर्यंतच्या महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रश्न 3: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कधी सुरू झाले?
उत्तर: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 27 नोव्हेंबर 1998 मध्ये सुरू करण्यात आली.
प्रश्न 4: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी जास्तीत जास्त किती रक्कम दिली जाते?
उत्तर: या योजनेत 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे व्यवसाय उद्योगधंदा चालू करण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी दिले जाते.