महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी 288 जागांवर मतदान होणार आहे. हे मतदान संपूर्ण राज्यात एकाच टप्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान करताना मतदाराची ओळख पटावी यासाठी 12 ओळखपत्रांची सूची जाहीर केली आहे. दिलेल्या 12 ओळखपत्रांपैकी एक तुम्ही मतदान करण्यासाठी सोबत नेऊ शकता.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या 12 ओळखपत्रांबद्दल माहिती
विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी मतदारांना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान कार्ड व्यतिरिक्त अजून 12 ओळखपत्रांची सूची जाहीर केली.
या यादीतील कोणतेही एक ओळखपत्र तुम्ही मतदान केंद्रात जाऊन दाखवू शकता. अधिकारी दिलेल्या पुराव्याची खात्री करतील, त्यानंतर तुम्हाला मतदान करता येईल. अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून देण्यात आली आहे.
12 ओळखपत्रांची सूची जाहीर करण्यामागचे खरे कारण म्हणजे बहुतेक लोकांच नाव हे मतदान यादीत असते. आणि त्यांना केंद्रीय निवडणूक आयोग मतदान ओळखपत्र सुद्धा देते, पण काही वेळा ते ओळखपत्र सापडत नाही किंवा हरवले असते.
त्या मुळे यादीत नाव असून सुद्धा मतदानापासून कोणी नागरिक वंचित राहू नये म्हणून आयोगाने 12 ओळखपत्रांची यादी दिली आहे. त्या पुराव्याने मतदाराची ओळख पटेल आणि मतदार हा त्याच्या मतदानाचा हक्क बजावू शकतो.
निवडणूक आयोगाने दिलेल्या 12 ओळखपत्रांची सविस्तर माहिती
1. मतदाराकडे आधार कार्ड (Aadhaar Card) असेल तर तो पात्र असेल.
भारतीय नागरिकांच्या विशिष्ट ओळखसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) संस्थाने आधार कार्ड तयार केले आहे. यात 12 अंकी नंबर, आधार कार्ड धारकाचा फोटो, बायोमेट्रिक पद्धतीने घेतलेली बोटांची ठसे व डोळ्यांच्या प्रतिमेची माहिती, पत्ता, जन्मतारीख मोबाईल नंबर आणि त्यासोबत आधार कार्डवर बारकोड असतो. ज्यावरून नागरिकांची ओळख पटण्यास मदत होते.
उपयोग: आधार कार्डचा उपयोग ओळख पटवण्यासाठी किंवा शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी केला जाऊ शकतो. आधार कार्ड हे भारतात सर्वांसाठी अनिवार्य आहे.
2. मतदाराकडे मनरेगा अंतर्गत दिलेले रोजगार ओळखपत्र असेल तर तो पात्र असेल.
ग्रामीण विकास मंत्रालयाने हे कार्ड तयार केले आहे. हे कार्ड भारतीय मनरेगा योजनेमध्ये नोंदणीकृत नागरिकांना दिले जाते. यात कामगाराची माहिती, नाव, वय, फोटो आणि ज्या गावात काम केले जाते तिथला संपूर्ण पत्ता असतो.
उपयोग: विशेषतः ग्रामीण भागातील मनरेगा अंतर्गत रोजगाराच्या हमीचा लाभ घेण्यासाठी आणि शेतमजुरांचा, कामगारांची ओळख पटवण्यासाठी या कार्डचा उपयोग केला जातो. या कार्डचा वापर करून गरीब मजूर जेव्हा मागेल तेव्हा सरकारकडून रोजगार मिळवू शकतो आणि आपल्या परिवाराचा उदार निर्वाह करू शकतो.
3. मतदाराकडे बँक किंवा टपाल खात्याचे पासबुक (छायाचित्रांसह) असेल तर तो पात्र असेल.
भारतीय बँका किंवा भारतीय टपाल हे नागरिकांना प्रदान करतात, जेणेकरून नागरिक याचा उपयोग त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी करू शकतात. यात खातेदाराचे नाव, पत्ता, खाते क्रमांक आणि खातेदाराच्या फोटोवर बँकेचा शिक्का असतो. म्हणून मतदानाजवळ नागरिकाची ओळख पटवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
उपयोग: याचा उपयोग बँकेत आपल्या आर्थिक व्यवहारांसाठी करू शकतो. ओळख आणि पत्त्याचा पुराव्यासाठी आपण बँक पासबुक वापरू शकतो.
4. मतदाराकडे कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड असेल तर तो पात्र असेल.
भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने भारतीय कामगारांसाठी हे कार्ड तयार केले आहे. आरोग्य सुविधांसाठी कामगार दिलेल्या कार्डचा वापर करू शकतो. यात कामगाराच्या विम्याचा तपशील, कामगारांचे नाव आणि फोटो असतो.
उपयोग: याचा उपयोग कामगारांच्या आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी केला जाऊ शकतो आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार या कार्डाचा वापर करू शकतात.
5. मतदाराकडे वाहनचालक परवाना (Driving Licence) असेल तर तो पात्र असेल.
भारत सरकारच्या परिवहन कार्यालयाने (RTO) भारतीय नागरिकांना भारतात वाहन चालवण्याचा अधिकार देण्यासाठी हा परवाना तयार केला आहे. यात चालकांचे नाव, पत्ता, फोटो, वैध तारीख आणि गाड्यांच्या प्रकाराचा उल्लेख असतो. हे कार्ड काढण्यासाठी अर्जदाराचे 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे आणि अर्जदाराला गाडी येणे बंधनकारक आहे.
उपयोग: याचा उपयोग वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना म्हणून केला जाऊ शकतो. ओळख आणि पत्ता पुराव्यासाठी कार्डचा वापर केला जाऊ शकतो.
6. मतदाराकडे पॅन कार्ड (PAN Card) असेल तर तो पात्र असेल.
भारत सरकारच्या आयकर विभागाने भारतीय नागरिकांसाठी तयार केले आहे. यात 10 अंकी अल्फान्यूमेरिक नंबर असतो. आयकर परतावा भरण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी, आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड (PAN Card) अनिवार्य आहे. यात नाव, वडिलांचे नाव, फोटो, जन्म तारीख असते.
उपयोग: याचा उपयोग आर्थिक व्यवहारांचा पुरावा म्हणून करू शकतो. ओळख, पुराव्यासाठी आणि आयकर परताव्यासाठी महत्त्वाची आहे.
7. मतदाराकडे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत स्मार्ट कार्ड असेल तर तो पात्र असेल.
भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्त विभागाने भारतीय नागरिकांसाठी तयार केले आहे. या कार्डाचा वापर राष्ट्रीय लोकसंख्येची नोंद ठेवण्यासाठी केला जातो. या कार्डमध्ये नागरिकांची वैयक्तिक माहिती असते.
उपयोग: याचा उपयोग ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून केला जाऊ शकतो. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्डाचा वापर केला जाऊ शकतो.
8. मतदाराकडे पारपत्र (Passport) असेल तर तो पात्र असेल.
परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकारने भारतीय नागरिकांसाठी तयार केले आहे. हे कार्ड नागरिकाचे राष्ट्रीयत्व दर्शवते, जेणेकरून नागरिक परदेशात प्रवास करू शकतो. यात नागरिकाचे नाव, फोटो, पत्ता आणि जन्मतारीख असते.
उपयोग: याचा उपयोग ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून केला जाऊ शकतो. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, परदेश प्रवास करण्यासाठी, व्हिसा अर्जासाठी या कार्डाचा वापर केला जाऊ शकतो.
9. मतदाराकडे निवृत्तीवेतन दस्तावेज (Pension Documents) असेल तर तो पात्र असेल.
संबंधित नियोक्ता किंवा निवृत्ती फंड व्यवस्थापन संस्थांनी भारतातील वयोवृद्ध नागरिकांसाठी तयार केले आहे. यात वृद्ध नागरिकाचे नाव, फोटो, पत्ता आणि निवृत्तीची तारीख असते.
उपयोग: याचा उपयोग निवृत्तीवेतन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, वयोवृद्ध व्यक्तींसाठी ओळख पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.
10. मतदाराकडे छायाचित्रांसह कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र असेल तर तो पात्र असेल.
केंद्र/राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, किंवा खाजगी कंपन्यांनी त्यांच्या कामगारांसाठी तयार केले आहे. यात कामगारांचे नाव, फोटो, पद आणि संबंधित संस्थेचा शिक्का असतो.
उपयोग: याने कर्मचारी ओळख करणे सुलभ होते. शासकीय आणि औद्योगिक परिसरांमध्ये प्रवेशासाठी ओळख पुरावा म्हणून वापरला जातो.
11. मतदाराकडे संसद, विधानसभा, विधान परिषदेचे सदस्य ओळखपत्र असेल तर तो पात्र असेल.
केंद्र/राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, किंवा खाजगी कंपन्यांनी त्यांच्या कामगारांसाठी तयार केले आहे. यात कामगारांचे नाव, फोटो, पद आणि संबंधित संस्थेचा शिक्का असतो.
उपयोग: अधिकृत ओळख पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. शासकीय कार्यक्रमांसाठी आणि सरकारी मालमत्तेचा वापर करण्यासाठी ओळख पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.
12. मतदाराकडे दिव्यांग व्यक्तींना दिलेले विशेष ओळखपत्र असेल तर तो पात्र असेल.
सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींसाठी तयार केले आहे. यात दिव्यांगाचे नाव, फोटो, पद आणि दिव्यांगतेचा प्रकार असतो.
उपयोग: याचा उपयोग दिव्यांग व्यक्तींना शासकीय सवलती मिळवण्यासाठी केला जातो. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वापर केला जातो. यात बस प्रवासामध्ये सवलत, सरकारी पेन्शन आणि अशा अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकतो.
हे देखील वाचा – प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना : इंटर्नशिप योजने विषयी माहिती |
या 12 ओळखपत्राचा वापर करून तुम्ही तुमचे अनमोल मतदान करू शकता. त्यासाठी तुम्हाला ब्लॉकमध्ये गेल्यानंतर एकदा व्हेरिफाय करून घ्यायचे आहे. जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही आणि तुम्ही या मतदानापासून वंचित राहणार नाही.