PM Kisan FPO Yojana : योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचा गट करून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. सरकार या योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या गटाला 15 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देते, जेणेकरून शेतकऱ्यांचा गट या निधीतून स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय करू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 11 शेतकऱ्यांचा एक गट असणे आवश्यक आहे. FPO योजनेमुळे शेतकरी वर्गाला स्वावलंबी होण्यास मदत होईल. या गटाला शेतकरी उत्पादक संघटना किंवा फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन (Farmer producer Organization) (FPO) म्हटले जाईल.
प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना (PM Kisan FPO Yojana)
2024 पर्यंत सरकारने 10,000 नवीन FPO (Farmer Producer Organization) तयार करण्याचे लक्ष ठेवले आहे आणि 30 लाख शेतकऱ्यांना या FPO योजनेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आतापर्यंत e-NAM पोर्टलवर 3,366 FPOs जोडले गेले आहेत. या योजनेसाठी सरकारने 6,865 कोटी रुपयांचा बजेट निश्चित केला आहे, FPO योजनेमार्फत शेतकरी वर्ग हा स्वावलंबी झाला पाहिजे हेच सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आणि देशात शेतकरी वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण भारतात राहणारा शेतकरी स्वतःच्या शेतात राबून कष्ट करतो. जेव्हा शेतातून निघालेला माल हा बाजारपेठेत विकण्यासाठी जातो, तेव्हा तिथे व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून खूप कमी भावात माल विकत घेतात.
कधी कधी विकलेल्या मालामधून त्यांना शेतीसाठी लागलेला खर्चही निघत नाही. अशा बऱ्याच कारणांमुळे लहान शेतकरी वर्ग हा शेतातून जास्त पैसा कमवू शकत नाही. म्हणून अशा शेतकऱ्यांना एकत्र जमवून स्वतः पिकवलेल्या मालाला स्वतः बाजारात विकता येईल. आणि जास्त नफा हा शेतकऱ्यांना येईल.
या उद्दिष्टाने भारत सरकार लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना घेऊन आली आहे. 11 शेतकऱ्यांचा समूहामुळे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची शक्ती वाढेल आणि FPO मार्फत शेतकरी बियाणे, खते आणि उपकरणे मोठ्या प्रमाणात विकत घेऊ शकतात, त्यामुळे त्यांच्या खर्चात बचत होते आणि उत्पन्नात वाढ होते.
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण आणि शेतीपूरक व्यवसायाची आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. जेणेकरून शेतकरी गट हा त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवू शकता. या योजनेत एकटा शेतकरी रजिस्ट्रेशन करू शकत नाही.
शेतकऱ्यांना FPOs/FPC चे फायदे काय आहेत?
फायदा 1: एफपीओ/एफपीसी (FPOs/FPCs) शेतकरी वर्ग एकत्रित काम करू शकतात आणि शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार एक लॉट किंवा अनेक लॉट म्हणून ई-ट्रेडिंगद्वारे (E-Trading) विकू शकतात.
फायदा 2: विकलेल्या मालाची पेमेंट FPO/FPCs बँक खात्यात जमा केली जाईल. किंवा FPO/FPCs सदस्यांमध्ये वितरित केली जाईल.
फायदा 3: 2017-2018 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात त्यांच्या जागेवर संकलन, वर्गीकरण, प्रतवारी, पॅकिंग सुविधा उपलब्ध करण्याची तरतूद केली आहे. ज्यामुळे शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल.
फायदा 4: गटाला वयक्तिक डॅशबोर्डची सुविधा आणि वस्तूंची आवक, गुणवत्ता आणि किंमत यासंबंधीची माहिती उपलब्ध असणार आहे. ज्यामुळे त्यांना त्यांच्या मालाची आणि चालू बाजारभावाची माहिती मिळवणे सोपे होईल.
पीएम किसान एफपीओ योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
अनुक्रमांक | योजनेचा लाभ कोण घेऊ शकता |
---|---|
1 | पीएम किसान एफपीओ योजना ही लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. |
2 | या योजनेमध्ये जमिनीची आकार मर्यादा दिली आहे. तेच या योजनेमध्ये शेत जमिनीची आकार मर्यादा सरकारने ठरवून दिली आहे. नियम आणि अटींमध्ये पात्र शेतकरीच फक्त योजनेचा लाभ घेऊ शकतात. |
3 | शेतकरी मित्रानो, तुम्हाला शेतीसोबतच तुमचे उत्पन्न वाढवायचे असेल आणि गटात काम करायची इच्छा असेल, तर असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कारण शेतीसोबत तुम्हाला दुसरे उत्पन्न मिळण्यास मदत होईल. |
अर्ज कसा करावा?
पीएम किसान एफपीओ योजनेसाठी (PM Kisan FPO Scheme) अर्ज कसा करावा ( FPO registration ), अगदी सोपी प्रक्रिया आहे.
पाऊल 1: शेतकरी हा e-NAM वेबसाइटवर किंवा मोबाइल ॲपद्वारे e-NAM पोर्टलवर नोंदणी करू शकतात. येथे क्लिक करा
पाऊल 2: तिसरा पर्याय जवळच्या e-NAM मंडीमध्ये खाली दिलेला तपशील प्रदान करून नोंदणी करू शकतात.
अनुक्रमांक | खाली दिलेला तपशील प्रदान करून नोंदणी पूर्ण करा |
---|---|
1 | तुमच्या FPO/FPC चे नाव. |
2 | तुमचे नाव, पत्ता, ईमेल आयडी आणि संपर्क नंबर. अधिकृत (रजिस्टर) व्यक्तीचे (MD/CEO/व्यवस्थापक) |
3 | बँक खात्याचे तपशील म्हणजे बँकेचे नाव, शाखेचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड. |
पाऊल 3: नोंदणीनंतर शेतकरी हे नजीकच्या एफपीओशी (FPO) जोडले जातील आणि त्यांना योजनेमध्ये उपलब्ध सुविधांचा लाभ मिळेल.
दिलेल्या घटकांचा विचार केला तर खरोखर तुम्हाला लाभ होईल.
घटक 1: तुम्हाला 11 शेतकरी हे तुमच्या जवळचे किंवा गावातले शोधावे लागतील, ज्यामुळे तुम्हाला नियोजन आणि संभाषणास फायद्याचे असेल. जवळचे शेतकरी असल्यास प्रत्येक शेतकऱ्यांविषयी तुम्हाला योग्य माहिती ही तुमच्या जवळ असणार आहे.
घटक 2: गटात शेतकरी जोडताना विश्वासू शेतकरी जोडा, ज्यांना गटात एकत्र काम करून स्वतःची आणि आपल्या गटाची प्रगती कशी होईल याबद्दल जिज्ञासा हवी. गट पुढे कसा जाईल या विषयी प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सभांना उपस्थित राहून. योग्य ज्ञान घेऊन त्याचा फायदा आपल्या गटाला कसा होईल याचा प्रयत्न करायला पाहिजे.
घटक 3: ग्रुपचा CEO निवडताना, त्याच्या विषयी अधिक माहिती गोळा करा, म्हणजे त्याचे शिक्षण, त्याची काम करण्याची कुशलता, त्यांच्या नावाने कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये FIR तर नाही ना, गटाच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे की नाही, जेणेकरून गटाच्या बाकी शेतकऱ्यांना याचा त्रास होणार नाही. आणि एक कुशल CEO हा आपल्या गटातील शेतकऱ्यांना पुढे नेण्याचे काम करेल.
घटक 4: तुम्ही अधिकारांच्या संपर्कात राहाल तर तुम्हाला नवनवीन प्रयोगांबद्दल माहिती मिळत जाईल, जेणेकरून तुम्ही त्याचा वापर तुमच्या गटाच्या विकासासाठी कराल.
घटक 5: तुमच्या गटाच्या व्यवहार किंवा बँक तपशीलावर गटात चर्चा करत जा, जेणेकरून तुम्ही तुमचे पुढील लक्ष्य आणि योजना तयार करू शकता. तुमहाला या गटामधून फायदा होत असेल तर अजून योग्य नियोजन करून त्यात कशी भर करू शकतो याचा विचार करावा. जर तुम्हाला नुकसान होत असेल तर तुम्ही तुमच्या गटाची सभा भरून योग्य नियोजन करून तुम्हाला होणाऱ्या नुकसानी पासून वाचू शकता.
FAQs : योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1: पीएम किसान एफपीओ (FPO) योजनेमार्फत किती अर्थसहाय्य दिलं जाणार आहे?
उत्तर: एका गटाला 15 लाख रुपये अर्थसहाय्य दिला जाणार आहे.
प्रश्न 2: FPO मध्ये किती सदस्य असावे?
उत्तर: FPO मध्ये किमान 11 शेतकरी असणे आवश्यक आहे.
प्रश्न 3: मोबाइल ॲपद्वारे योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतो का?
उत्तर: हो, प्ले स्टोरवरून e-NAM मोबाईल अॅप डाउनलोड करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.
प्रश्न 4: FPO मधून शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळू शकतात?
उत्तर: बी-बियाणे, खते, यंत्रसामग्री, मार्केट लिंकेज, प्रशिक्षण, नेटवर्किंग, आर्थिक मदत आदी सुविधाही एफपीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरविल्या जातात. ही संस्था शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी मदत करते.
प्रश्न 4: पीएम किसान एफपीओसाठी (FPO) रजिस्ट्रेशन कसे करावे?
उत्तर: एफपीओ योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या अधिकृत वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकता.
प्रश्न 4: पीएम किसान एफपीओ योजनेची वैशिष्ट्ये
उत्तर: या योजनेत नोंदणी केलेली FPO ही एका कंपनीप्रमाणे काम करेल. कंपनीला ज्या प्रकारे फायदा हा सरकारकडून मिळत राहतो, त्याचप्रमाणे FPO ला सुद्धा देण्यात येणार आहे. त्यासाठी संघटनेला व्यवसाय चालू करण्यासाठी सरकारकडून अर्थसहाय्य 15 लाख रुपये देण्यात येणार आहेत.