मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) योजनेमध्ये खूप अफवा सध्या समोर येत आहेत. महिलांना फ्रीमध्ये मोबाईल, महिलांना 5,500 रुपये दिवाळी बोनस आणि ही योजना बंद झाली. सविस्तर पाहू या. येणाऱ्या बातम्या खरंच अफवा आहेत की खरंच महिलांना भेटणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojane
महाराष्ट्र राज्यातील महिलांना त्यांचं आर्थिक, आरोग्य, स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि कुटुंबातील भूमिका मजबूत होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोज “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरु करण्यास मान्यता दिली. या योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील मुलींना आणि महिलांना 1,500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांना मिळाला आहे. 2 कोटी 40 लाख महिलांनी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे. या योजनेत 50,000 हजारापेक्षा जास्त अर्ज हे बाद केले आहेत.
सरकारने आता महिलांच्या बँक खात्यात 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रुपये DBT च्या माध्यमातून जमा करण्यात आले आहेत. या योजनेत जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्याचे 7,500 रुपये जमा करण्यात आले आहेत.
योजनेविषयी फेक न्यूज आणि अफवा
1. महिलांना फ्रीमध्ये मोबाईल
महिलांनो, सरकारने अशी कोणतीही घोषणा किंवा GR काढलेला नाही आहे. म्हणून राज्यात फिरत असलेली फ्रीमध्ये मोबाईल भेटेल ही बातमी सर्रास खोटी आहे. त्यामुळे महिलांना लाडकी बहीण योजने (Ladki Bahin Yojana) मध्ये मोबाईल भेटणार नाही आहे. आणि तुम्हाला फोने येऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. म्हणून महिलांनो, सावध राहा आणि अफवांना बळी पळू नका. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.
2. महिलांना 5,500 रुपये दिवाळी बोनस
मी कुठे बातम्या पाहतोय तर कुठे Youtube वर व्हिडिओ पाहतोय. त्यात सांगण्यात येत आहे की महिलांना सरकार काही पात्र महिलांना 3,000 रुपये आणि काही महिलांना 2,500 रुपये असे एकूण 5,500 रुपये दिवाळी बोनस म्हणून जमा करण्यात येणार आहे.
हे सर्व सर्रास अफवा आहेत. स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी स्पष्ट सांगितलंय की सरकारने असा कोणताही नवीन GR नाही काढलाय, ही पण एक अफवा आहे. या कडे महिलांनी दुर्लक्ष करावे. नाहीतर काही फसव्या टोळी कडून तुमची फसवणूक होऊ शकते.
3. माझी लाडकी बहीण योजना बंद झाली
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागली आहे, त्याच्याच अनुषंगाने राज्यात आचारसंहिता लावण्यात आलेली आहे. म्हणून या आचारसंहितेमुळे योजनेला काही वेळेसाठी बंद केले आहे. मतदानानंतर आणि राज्यात नवीन सरकार आल्यावर नवीन सरकार या योजनेला पुढे चालवेल आणि योग्य ते निर्णय घेईल.
मग येणारी नवीन सरकार योजनेच्या काही नियमांमध्ये बदलही करू शकतात, नाहीतर पूर्वीच्या नियमानुसार योजना पुढे चालू ठेवतील. ते संपूर्ण येणाऱ्या सरकारवर अवलंबून आहे. म्हणून ही योजना बंद झालेली नाही.
योजनेविषयी माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात अमलात आणली आणि महिलांचे रेजिस्ट्रेशन चालू झाले. या योजनेत 31 ऑगस्ट 2024 ही रेजिस्ट्रेशनची शेवटची तारीख दिली होती, नंतर 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख महिलांना रेजिस्ट्रेशनसाठी देण्यात आली. नंतर 31 सप्टेंबर आणि आता 15 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख दिली होती.
तरी काही महिलांची रेजिस्ट्रेशन बाकी असेल, त्यांनी आता आचारसंहिता संपल्यानंतर पुढील आदेशाची वाट पाहावी. त्यानंतर योजनेमार्फत 15 ऑगस्ट 2024 पर्यंत रेजिस्ट्रेशन अँप्रोव्ह (Approve) झालेल्या महिलांना 3,000 रुपयांचा लाभ हा त्यांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात आला.
नंतर सप्टेंबर महिन्यात काही महिलांना 1,500 रुपये आणि सर्व हफ्ते बाकी असलेल्या महिलांना 4,500 रुपये जमा करण्यात आले. आणि ऑक्टोबर महिन्यात महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये जमा करण्यात आले.
योजनेत कोणत्या महिला पात्र असतील
1. महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे किमान 21 आणि कमाल 65 वर्ष वय असणे आवश्यक आहे.
3. लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नको.
4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला अर्ज करू शकतात.
5. महिलांचे वेगळे बँक खातं असणं आवश्यक आहे. (बँक खाते हे आधार लिंक असणे आवश्यक आहे)
योजनेत कोण अपात्र असणार
अनुक्रमांक | कोण अपात्र असणार |
---|---|
1 | लाभार्थी महिला EPFO/NPS/ESIC यांचा सदस्य असेल किंवा यांचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असणार. |
2 | लाभार्थी महिला किंवा तिच्या परिवारात कोणताही व्यक्ती हा आयकर भरणारा नसावा. आयकर भरणारा असेल तर महिला या योजनेत अपात्र असेल. |
कोणते कागतपत्र असणे आवश्यक आहे
1. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड लागेल.
2. बँक खाते / जन धन खाते क्रमांक (बँकेचा IFSC नंबर असणे आवश्यक).
3. अधिवास प्रमाणपत्र – (तुमच्या जवळ अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुमचे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षांपूर्वीचे जुने रेशनकार्ड किंवा 15 वर्षांपूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी एक प्रमाणपत्र तुम्ही सादर करू शकता)
4. लाभार्थी महिलेचे हमीपत्र, फोटो, फॉर्म भरणार त्या दिवसाची तारीख, सही किंवा अंगठा लावलेला असावा.
5. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील रहिवाशी पुरुषासोबत लग्न केलं असेल तर, नवऱ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक पुरावा जोडणे बंधनकारक असेल
6. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ग्राह्य धरून जमा करावे. ते ग्राह्य धरण्यात येणार आहे.
योजनेविषयी आवश्यक माहिती
1. महिलांनो या योजनेत रेजिस्ट्रेशनसाठी कोणतेही शुल्क नाही. म्हणून फॉर्म भरताना कोणालाही शुल्क देऊ नका
2. ऑटो डेबिट सुविधा चालू असेल आणि तुमच्या खात्यात पर्याप्त शिल्लक नसेल तर त्या साठी लागणारा 10 रुपये चार्ज हा लाभार्थ्याच्या खात्यातून वजा करण्यात येईल.
3. तुमच्या खात्यातून अधिक रक्कम वजा झाली असेल तर तुम्ही टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकता: – 14434.
टीप
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ही फक्त राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बंद केली आहे. आचारसंहितेनंतर योजना परत चालू होईल.
FAQs
प्रश्न 1: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत 5,500 रुपये दिवाळी बोनस भेटणार आहे का?
उत्तर: नाही, सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही किंवा GR काढलेला नाही.
प्रश्न 2: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांना मोबाईल देण्यात येणार आहेत का?
उत्तर: नाही, ही एक अफवा आहे. अशी कोणतीही घोषणा सरकारने केलेली नाही.
प्रश्न 3: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद झाली?
उत्तर: नाही, आचारसहितेमुळे ही योजना तात्पुरती बंद केली आहे.
प्रश्न 4: लाडकी बहीण योजनेसाठी काय कागदपत्रे लागतात?
उत्तर: उपडेट आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो हे सर्व कागदपत्र लागणार आहेत.
प्रश्न 5: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा?
उत्तर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही मोबाईल अँपचा वापर करू शकता किंवा सरकारने बनवलेल्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरू शकता. ऑफलाईन फॉर्म हा अंगणवाडी सेविकांकडे जाऊन भरू शकता.