आंबा बागेचे नियोजन: अनियमित बहार येण्याची कारणे, संगोपन आणि विशेष काळजी

आंबा बागेचे नियोजन : आंबा हा “फळांचा राजा” आहे आणि तो घरातल्या प्रत्येक व्यक्तींचा प्रिय फळांपैकी एक आहे. पण शेतकऱ्यांना आंबा बागेतील उत्पादन, फळाची गुणवत्ता आणि अनियमित बहार येणे अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यासाठी त्याचे योग्य संगोपन आणि विशेष नियोजन करणे खूप महत्वाचे आहे. शेतकरी बांधवांनी योग्य नियोजन केले तर उध्दभवणाऱ्या समस्यांवर हमखास मात करू शकता आणि भरगोस उत्पन्न घेऊ शकता. त्याविषयी सविस्तर पाहू या.

Table of Contents

ब-यापैकी नियमित बहार आढळणाऱ्या जाती

शेतकरी मित्रानो, देशात काही आंब्याच्या जाती आहेत, त्यांना चालल्या प्रकारे वर्षी झाडाला नियमित बहार लागताना पहिलं जातं. नीलम, बांगनापल्ली, तोतापुरी, कालेपाड आणि सेंथुरा ह्या जातीच्या आंब्याच्या झाडांना जास्त कमी प्रमाणात फळे लागतात. ह्या जातीची झाडे ही चांगले उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने लावली जातात. आंब्याची फळबाग लावणारे शेतकरी अश्याच जास्त उत्पादन देणाऱ्या जातीची निवड आपली शेतात झाडे लावण्यासाठी करतात.

सर्वात जास्त अनिश्चित बहार आढळणाऱ्या जाती

देशात काही आंब्याच्या जाती आहेत, त्या आंब्याच्या जातींना अनियमित बहार लागताना पाहिले जाते. हापूस, इमाम पसंद, मुलगोवा, पायरी ह्या जातीच्या झाडांना अनिश्चित फळे लागतात. आणि या जातीचे झाडे आपल्याला किंचितच पाहायला सुद्धा मिळतात.

हे पण वाचा – रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती

आंबा बागेत अनियमित बहार येण्याची कारणे

TagsMango Orchard Management

अनियमित बहार येणे शेतकरी बांधवांसाठी खूप मोठे आव्हान आहे. अनियमित बहार येण्यामागे खूप सारे कारणे आहेत. हवामान बदल, पाण्याचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, छाटणीत हलगर्जीपणा करणे, शेतातील मातीची गुणवत्ता खराब होणे, सेंद्रिय व रासायनिक खतांचे नियोजन व्यवस्थित नाही.

अनियमित बहार येण्याचे खूप सारे कारणे असू शकतात. शेतकऱ्यांनी सर्वात आधी आपल्या बागेचे निरीक्षण करून ते कारण ओळखून नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांच्या योग्य सल्ल्याने बागेचे संगोपन करावे, जेणेकरून येणारा बहार हा नियमित येऊल.

1. हवामानातील बदल

आंब्याला बहार येण्याच्या काळात हवामानात बदल होत असेल तर त्यांचा परिणाम त्याच्या मोहोरावर पडतो. आणि त्याचा थेट परिणाम हा फळधारणेवर होतो.

कारण आंब्याला बहार लागण्यासाठी एक ठराविक तापमान आणि आर्द्रता असणे आवश्यक आहे. त्यासोबत थंडीचे प्रमाणही कमी झाल्यास आंब्याला बहार लागण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणून हवामानाचा योग्य अंदाज पाहून झाडावर उपाय योजना करावीत

2. पाण्याचा अभाव

शेतकरी बांधवांनो, फळ बागेत पाण्याचे नियोजन चुकले तर याचा परिणाम झाडाच्या पोषणावर होतो. आणि त्यामुळे याचा परिणाम बहार आणि फळधारणेवर पाहण्यात येतो. त्यामुळे पाण्याचे नियोजन योग्य रित्या करा, नाहीतर याचे खूप मोठे नुकसान तुम्हाला उत्पन्नात दिसेल. तुम्हाला विजेची समस्या येत असेल तर तुम्ही तुमच्या शेतात सोलरची व्यवस्था करू शकता. सरकार शेतकऱ्यांसाठी खूप योजना राबवत आहे.

जसे की मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana), पीएम कुसुम योजना, सौर कृषी पंप योजना असे खूप सारे योजना सरकार राबवत आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन विजेच्या संकटापासून दूर राहणार आणि तुम्हाला पाण्याचे नियोजन करणे व्यवस्थित होईल.

3. खतांचे असंतुलन

आंब्याच्या झाडांना योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद, आणि पालाश देणे गरजेचे आहे. जर तुमच्या फळ बागेत झाडांच्या पोषणतत्त्वांत असंतुलन निर्माण झाले तर याचा परिणाम उत्पन्नावर होतो.

काही वेळा नत्रयुक्त खते जास्त प्रमाणात वापरल्याने बागेत झाडांच्या पानांचा विकास होताना दिसतो. पण मोहोर कमी लागताना पाहायला मिळते.

4. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव

आंब्याच्या झाडांवर प्रामुख्याने फुलकिडे, चुरडा-मुरडा रोग आणि कोळी या सारख्या किडी आढळतात. त्या किडीमुळे लागणाऱ्या मोहोरचा नाश होतो. आणि दुसरे म्हणजे, बुरशीजन्य रोगांमुळे फळांचा दर्जा ही कमी होताना पाहिला जातो.

5. झाडांची छाटणी

झाडांची छाटणी योग्य वेळी न केल्याने फांद्या जुन्या होतात. जुन्या फांद्यांना मोहोर लागत नाही आणि याचा परिणाम उत्पादनात सुद्धा दिसून येतो. योग्य वेळी छाटणी न केल्याने बागेत सूर्यप्रकाश आणि हवा पोहचत नाही आणि याचा परिणाम झाडाच्या मोहरीवर होतो.

6. जमिनीची गुणवत्ता

जमीनेच्या pH मध्ये असमतोल निर्माण झाल्यास याचा परिणाम झाडांवर पाहायला मिळतो. किंवा शेतात सेंद्रिय खतांची कमतरता असेल तर झाडांना आवश्यक तेवढे पोषणतत्त्वे मिळत नाहीत. याचा ही परिणाम आपल्याला उत्पन्नावर दिसतो.

आंबा बागेची घ्यावयाची विशेष काळजी

तुमच्या बागेला अनियमित बहार येण्यापासून सुरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. योग्य नियोजन केले तर आंब्याचे उत्पादन नक्कीच वाढेल. त्या साठी घ्यावयाची काळजी.

1. योग्य आंब्याच्या वाणांची निवड

भारताचे हवामान आणि जमिनीची योग्यता पाहता, भारतात केसर, हापूस, दशहरी आणि अल्फान्सो या जातींची निवड शेतात लावण्यासाठी योग्य ठरेल. म्हणून शेतकरी बांधवांनी त्यांच्या परिसरातील हवामानाचा अभ्यास करून योग्य जातीची निवड करावी.

2. झाडाची योग्य छाटणी

झाडांची छाटणी ही योग्य वेळी केल्याने बागेत हवा आणि सूर्यकिरणे झाडांना योग्य प्रमाणात मिळतात. झाडांच्या जुन्या फांद्या तोडून टाकल्याने झाडांना नवीन फांद्या फुटण्यास मदत होते आणि झाडाला बहारही नियमित येत राहते.

3. पाण्याचे योग्य नियोजन

झाडांना ठरवलेल्या वेळेवर योग्य पाणी द्यावे. जेव्हा झाडाला बहार आणि मोहोर लागण्याचा वेळ असतो, तेव्हा पाण्याची गरज असते. शेतात पाणी साचू देऊ नका, नाहीतर आंब्याच्या झाडांच्या मुळांना सडण्यास सुरुवात होते.

तुम्ही आधुनिक पद्धतीने म्हणजे ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्यास पाण्याची बचत होईल आणि झाडांना योग्य पोषण मिळण्यास मदत होईल.

4. खतांचे नियोजन

आंब्याच्या झाडांना नत्र, स्फुरद, आणि पालाश योग्य पद्धतीने दिले गेले पाहिजे. तुमच्या बागेत शेणखत आणि गांडूळ खत वापरून तुमच्या जमिनीची पोत सुधारावी. आंब्याच्या झाडांना प्रत्येक वर्षी सेंद्रिय खताचा पुरवठा करत राहावा.

5. झाडांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करावे

वेळोवेळी आंबाच्या बागेचे निरीक्षण करत राहावे. रोगांनी ग्रस्त फांद्या आणि खराब फळे वेळेवर काढून टाका, जेणेकरून त्यांचा परिणाम दुसऱ्या फळावर आणि फांद्यांवर पडू नये.

मोहोर आणि फळांना कीडपासून वाचवण्यासाठी वेळोवेळी कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन कीटकनाशक फवारणी करून घ्यावी.

6. हवामान बदल

हवामानात बदल झाल्यास मोहोरवर याचा परिणाम होतो. त्यामुळे हवामानाचा अंदाज पाहून झाडांवर कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून नुकसान होणार नाही आणि उत्पन्नातही वाढ होईल.

हे देखील वाचा – प्लास्टिक मल्चिंग पेपरवर सरकार देत आहे 50 टक्के अनुदान

महत्त्वाचे टिप्स

1. बागेसाठी उपलब्ध शासकीय योजना

शेतकऱ्यांनी शेतात फळ बाग लावावी याकरिता प्रोस्थाहीत करण्यासाठी सरकार खूप प्रकारचे अनुक्रम राबवत आहे. सरकार फळबागेसाठी अनुदान देते, ‘राष्ट्रीय फलोत्पादन अभियान’ ही योजना बहुचर्चित आहे.

योजनांचा फायदा देशातील अनेक फळबाग शेतकरी घेत आहेत. त्यासोबत बागेला पुनरुज्जीवन आणि बागेचे व्यवस्थापन करण्यासाठीही सरकार खूप सारी योजना राबवत आहे. शेतकरी बांधव जवळच्या कृषी विभागाला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. अशा योजनांचा लाभ घेऊन आपल्या शेतातही फळ बाग फुलवू शकता.

2. कृषी अधिकाऱ्यांचे सल्ले

शेतकरी बांधवानो, तुमच्या फळबागेचे चांगले व्यवस्थापन ठेवण्यासाठी वेळोवेळी कृषी अधिकारी आणि फळ संशोधन केंद्रांना भेट देऊन त्यांच्या सल्ल्याने नियोजन करत चला. कारण त्यांना हवामानाचा तंतोतंत अंदाज असतो

आणि कोणत्या वाणाला कधी कोणते पोषणतत्त्व आणि फवारणीची गरज आहे, हे त्यांना त्यांच्या अभ्यासामुळे माहित असते. तेच तुम्ही तुमच्या फळबागेसाठी वापरा आणि चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळवा.

भारतात आंब्याच्या कोणत्या जातीचे झाडे लावली जातात

  • केसरी – केसरी आंबा खाण्यासाठी गोड चव असते आणि पिवळ्या रंगाचा दिसत असल्याने देशात केसरी आंबा खूप लोकप्रिय आहे.
  • आलफोंसो – आलफोंसो आंबा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. खाण्यासाठी गोड चव असल्याने जगभरात या आंब्याची खूप मागणी आहे.
  • हापूस – हापूस आंबा संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. खाण्यासाठी गोड असल्याने आंब्याची खूप मागणी आहे. हापूस आंब्याची शेती महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते.

कुलत, दासेरी, पद्मा, राजापुरी असे अनेक प्रकारचे आंब्याचे जाती भारतात लावले जातात आणि लोकांमध्ये त्याची लोकप्रियता खूप आहे.

FAQ’s: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: भारतात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते?
उत्तर: भारतात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन हे उत्तर प्रदेश राज्यात घेतले जाते.


Leave a Comment