सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळखताचे फायदे आहेत आणि त्यालाच आपण वर्मी कंपोस्ट असेही म्हणतो. याचा वापर शेतात केला तर मातीची पोत सुधारतेच, पण सोबतच तुमच्या उत्पादनातही वाढ होते. त्यासोबतच गांडूळखत वापरल्याने मातीत हवा खेळती राहते, आणि तुमच्या शेतातील मातीची जलधारणक्षमता सुद्धा वाढ पाहायला मिळते. जमिनीचा pH सुद्धा सुधारतो. अजून असे अनेक फायदे हे गांडूळ खताचे आहेत. चला, अजून काही फायदे आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती पाहूया.
गांडूळखताचे फायदे: जमिनीची पोत सुधारते
एक सर्वे नुसार असे लक्षात आले आहे की रासायनिक खतांच्या जास्त वापराने जमिनीची पोत खराब होत चालली आहे. त्यासाठी गांडूळ खत खूप उपयोगी मानले जाते. गांडूळ खत जमिनीची पोत सुधारण्यास मदत करतो. वर्षानुवर्षे शेतकरी आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर केल्याने शेतातील माती कठीण आणि खूप घट्ट बनत जाते.
ज्यामुळे जमिनीत हवा कमी प्रमाणात पोहोचते. असे झाल्याने जमिनीला लागणारे पोषणतत्त्वे हे योग्य प्रमाणात मिळत नाहीत. पण जर तुम्ही शेतात गांडूळ खताचा योग्य वापर केला तर शेतातील माती नरम आणि भूसभुशीत होऊन तिची गुणवत्ता वाढेल. भूसभुशीत जमिनीत हवेचा प्रवाह वाढल्याने मुळांना योग्य पोषण मिळते आणि त्यांची योग्य वाढ होते.
शेतातील माती भूसभुशीत झाल्याने पाणीचा निचरा हा योग्य रीतीने होऊ लागतो. याचा फायदा हा झाडांच्या पोषणावर दिसतो. गांडूळ खतामुळे जमिनीची पोत सुधारणे हा एक सोपा मार्ग आहे.
मातीच्या कणांच्या रचनेत बदल
शेतातील मातीतल्या कणांचे योग्य मिश्रण करणे गरजेचे आहे कारण लहान आणि मोठ्या कणांचे योग्य मिश्रण केल्याने माती चांगल्या प्रमाणात भुसभुशीत आणि गुळगुळीत बनते. गांडूळ हे मातीत फिरत असताना मातीतल्या कणांचा आकार बदलवत असतात, त्यामुळे जमिनीत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो.
त्यामुळे मातीची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते. मातीच्या मिश्रणामुळे निचरा (drainage) योग्य होतो आणि धूप (erosion) कमी होतो. मातीमधील गुणवत्ता आणि टिकाव वाढून राहतो, आणि मिश्रणामुळे जमीन स्थिर आणि सुपीक बनवते. तुमच्या मातीचा आणि पीक उत्पन्नात नक्कीच फायदा होईल.
जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता
शेतकरी बांधवानो, शेतात योग्य पद्धतीने गांडूळ खताचे नियोजन केल्यास शेतातील माती अधिक वेळ आणि जास्त प्रमाणात पाणी धरून ठेवते. गांडूळ खत वापरल्याने त्यातील “ह्युमस” नावाचा सेंद्रिय पदार्थ जो शेतातील मातीच्या कणांशी जोडला जातो.
ह्युमस हा मातीतला ओलावा टिकवून ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो, ज्यामुळे शेतातल्या मातीवर आणि पिकांवर याचा सकरात्मक परिणाम पाहायला मिळतो. ज्यामुळे शेतात सिंचनावर होणार खर्च कमी होण्यास मदत होते. ज्या क्षेत्रात पाण्याची कमी असेल अशा भागात हे खूप उपयोगी आहे.
जमिनीचा pH (पी.एच.) सुधारतो
मातीतला सामू (pH) म्हणजे मातीतील अॅसिडिटी म्हणजे मातीला खूप आंबट बनवणे किंवा अल्कलाइनिटी म्हणजे मातीला खूप घट्ट बनवणे. हे जमिनीत वाढले तर जमिनीच्या पोषणतत्त्वांमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे याचा परिणाम आपल्याला पिकांवर आणि येणाऱ्या उत्पन्नावर दिसतो.
जमिनीचा pH (पी.एच.) सुधरवण्यासाठी गांडूळ खातात आढळणारा “ह्युमस” मदत करतो. ह्युमस हा जमिनीतील अॅसिडिटी किंवा अल्कलाइनिटी कमी करण्यास मदत करतो. ज्यामुळे माती एकदम भुसभुशी राहते आणि सर्व प्रकारच्या पिकांसाठी छान परिस्थिती निर्माण करते.
जमिनीतला pH (पी.एच.) संतुलित असेल तर पिकांना योग्य प्रमाणात नत्र (नायट्रोजन), स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्मद्रव्य मिळतात. त्यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादन वाढते.
हे देखील वाचा – शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना |
मातीचा कस टिकून राहतो
मित्रांनो, शेतात गांडूळ खत वापरल्याने मातीतील पोषणतत्त्वे वर्षानुवर्षे टिकून राहण्यास मदत होते. मुख्य म्हणजे, सेंद्रिय खतात आढळणारा ह्युमस हा खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. तो जमिनीला भूसभुशीत आणि हलकी बनवतो.
यामुळे जमिनीतील सूक्ष्मद्रव्ये आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण राखण्यास मदत होते, आणि पीक हे उत्तम आणि उच्च दर्जाचे येतात. गांडूळ खताचा वापर केल्याने जमिनीतील जीवाणूंची संख्येत वाढ होते. त्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश हे पोषण लवकर उपलब्ध होण्यास मदत होते.
त्या मुळे मातीचा कस टिकून राहतो. त्यामुळे रासायनिक खत वापरण्याची गरज कमी होते, आणि मातीची नैसर्गिक सुपीकता कायम राहते.