रब्बी हंगामातही 1 रुपयात मिळणार पीक विमा

2024-25 च्या रब्बी हंगामासाठी शेतकरी 1 नोव्हेंबरपासून पीक विमाचा (Crop Insurance) ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, हरभरा, गहू, कांदा आणि ज्वारी या रब्बी पिकांसाठी शेतकरी विमा काढू शकतात.

एक रुपयात पीक विमा योजना

महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत खरीब आणि रब्बी हंगामात पिकवले जाणारे सर्व अन्नधान्य, तृणधान्ये, बाजरी, कडधान्ये आणि तेलबिया पिकांसाठी महाराष्ट्र सरकारने 1 रुपयात पीक विमा सुरू केला आहे.

खरीप हंगामाप्रमाणे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक विमा मिळणार आहे. याच अनुषंगाने 2024-25 मध्ये शेतकरी बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात खरीप हंगामासाठी 1 रुपयात पीक विमा काढला. अशा प्रकारे आता सरकारने शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी पीक विमा काढण्यास 1 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या वर्षी पावसाळा चांगला झाल्याने विमा काढण्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद पाहताना दिसतो.

हे पण वाचा – Digital Crop Survey: रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी संपूर्ण माहिती

पीक विमा (Crop Insurance) म्हणजे काय

शेतकरी पूर्ण हंगाम शेतात मेहनत करून पेरणी किंवा लागवड करतो. काही नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल, कीडरोग किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याचे साधन म्हणजे पीक विमा. शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांना पुढच्या हंगामात होणाऱ्या खर्चासाठी मदत होते.

पीक विमा प्रक्रिया कधी सुरू होणार आहे

रब्बी हंगामासाठी रब्बी विमा काढण्यास 1 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पीक विमा (Crop Insurance Scheme) योजनेसाठी लागणारी उर्वरित रक्कम ही राज्य सरकार भरणार आहे. राज्यात रब्बी पिकांसाठी म्हणजे गहू, ज्वारी, हरभरा आणि कांदा या पिकांचा विमा शेतकरी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

तर उन्हाळी भुईमूग, उन्हाळी भात या पिकांसाठी 31 मार्च 2025 पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) काढण्याची मुभा देण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता

rabi hangam pik vima patrata

अनुक्रमांकलाभार्थ्यांची पात्रता
1शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
2ती जमीन शेती करण्यायोग्य पाहिजे.
3कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरीसुद्धा योजनेसाठी पात्र असणार आहे.
4भाडे तत्वावर शेती करणारे शेतकरी योजनेसाठी पात्र असतील.

पीक विमा काढण्यासाठी लागणारी कागदपत्र

rabi hangam pik vima documents

अनुक्रमांकलागणारी कागदपत्र
1शेतकऱ्याचं आधार कार्ड.
2बँक पासबुक (आधार संलग्न खाते हवे).
3७/१२ उतारा.
4८ अ प्रमाणपत्र.
5स्वघोषणा पत्र.

विमा फॉर्म कसा भरायचा

स्टेप 1: शेतकरी स्वत: सरकारने अधिकृत तयार केलेल्या PMFBY पोर्टलवर जाऊन 1 रुपयात पीक विमा काढू शकतात. येथे क्लिक करा

स्टेप 2: तसेच शेतकरी बँकेत, कंपनी प्रतिनिधी किंवा CSC सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.

हे देखील वाचा – रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती

FAQs : वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: कोणत्या पीकांवर विमा घेऊ शकतो?
उत्तर: सर्व अन्नधान्य, तृणधान्ये, बाजरी, कडधान्ये, तेलबिया आणि वार्षिक व्यावसायिक/वार्षिक बागायती पिकांसाठी विमा घेऊ शकतो.

प्रश्न 2: रब्बी हंगामासाठी पीक विमा प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?
उत्तर: 1 नोव्हेंबरपासून शेतकरी विम्यासाठी अर्ज करू शकतात. गहू, ज्वारी, हरभरा आणि कांदा या पिकांसाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात, तर उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी भात या पिकांसाठी 31 मार्च 2025 पर्यंत शेतकरी अर्ज करू शकतात.

प्रश्न 3: विमा ची उर्वरित रक्कम कोण अदा करतो?
उत्तर: 1 रुपया भरून पीक विमा घेतल्यानंतर उर्वरित रक्कम ही राज्य सरकार भरते.

Leave a Comment