महाराष्ट्रातील महिलांना सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या योजना

महाराष्ट्रातील महिलांना सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार राबवत आहे अनेक योजना: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सन्मान योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. या योजना राबवून महाराष्ट्रातील महिलांना सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

योजना चालू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट

mahilansathi rabavlya janarya yojana

या सर्व योजनेंमार्फत राज्यातील महिलांना स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवणे, महिलांचे प्राथमिक आरोग्य, पोषणात सुधार, शिक्षण क्षेत्रात मुलींचे प्रमाण वाढवणे, महिलांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणे या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मागील 2 वर्षांत खूप योजना अमलात आणल्या. योजनेंविषयी सविस्तर माहिती आपण पाहूया.

हे पण वाचा – शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना

लेक लाडकी योजना

राज्यात मुलींचा जन्मदर आणि शिक्षणाचा दर पाहता, राज्यसरकारने मुलींना प्रोत्साहीत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्ट 2017 साली माझी कन्या भाग्यश्री योजना अंमलात आणली. पण योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून सरकारने जुन्या योजनेत सुधारणा करून 2023-24 च्या अर्थसंकल्पात योजनेला नवीन योजना अंमलात आणली.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना लागू केली. महाराष्ट्रातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक परिवारात मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षांची होईपर्यंत टप्या टप्याने अनुदान देण्यात येईल. 18 वर्षानंतर मुलीला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.

या योजनेतून मुलींना 1 लाख 1 हजार रुपये टप्या टप्याने देण्यात येणार आहेत. त्यात मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये या प्रमाणे देण्यात येणार आहेत.

सरकारने ही योजना चालू करण्यामागे खूप महत्त्वाचे उद्दिष्टे आहेत. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, कुपोषण कमी करणे. हे सर्व उद्दिष्टे घेऊन सरकारने योजना सुरू केली आहे.

महिला सन्मान योजना

महाराष्ट्र सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ही योजना अमलात आणली. या योजनेमार्फत महाराष्ट्रातील महिलांना सरसकट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ खास महिलांना केंद्र करून ही योजना महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या महिलांसाठी चालू करण्यात आली. या योजनेचे उद्दिष्ट महिलांना स्वतंत्र, आर्थिक आणि आत्मनिर्भर बनवण्याचे आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

राज्यातील महिलांना स्वतंत्र आणि सवलंबी, महिलांचे आरोग्य आणि पोषणात सुधार होण्यासाठी, कुटुंबात त्यांची भूमिका ठोस करण्याच्या हेतूने महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र 28 जून 2024 च्या अर्थसंकल्पात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरु केली. योजनेमार्फत महिलांना 1,500 रुपये प्रति महिना देण्याचं सरकारने ठरवलं.

या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून राज्यात करण्यात आली. या योजनेचा पहिला हफ्ता ऑगस्ट महिन्यात महिलांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून टाकण्यात आला. आतापर्यंत या योजनेमार्फत 5 हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा केले गेले आहेत. म्हणजे 7,500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले गेले.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक असल्याने राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे ही योजना बंद करण्यात आली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर, म्हणजे डिसेंबरमध्ये, परत ही योजना सुरु करण्यात येईल. नंतर महिलांना सहावा हफ्ता देण्यात येणार आहे.

मुलींना मोफत शिक्षण योजना

राज्यात व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 5 ऑगस्ट 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला की, ज्या मुलींच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे

आणि व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील अशा सर्व मुलींना व्यावसायिक शिक्षणामध्ये मिळणाऱ्या शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के लाभाऐवजी 100 टक्के सवलत 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे.

या योजनेसाठी सरकारने 906.05 कोटी रुपये इतका अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता दिली आहे. या योजनेमार्फत अनाथ मुले आणि मुली यांना सुध्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा उद्दिष्ट मुलींना व्यावसायिक क्षेत्रात घेऊन येणं आहे, जेणेकरून राज्यातील मुलींमध्ये सुद्धा शिक्षणाची आवड निर्माण होईल आणि मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढेल.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

2024 च्या विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील महिलांना तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेमध्ये उज्ज्वला गॅस योजनेमधील महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

सरकारने आणखी योजनेत बदल करून नवीन GR काढला आहे. ज्या महिला योजनेस पात्र आहेत पण त्यांच्या नावे गॅस जोडणी नसेल, अशा महिलांनी लवकरात लवकर जोडणी त्यांच्या नावे करून घेणे, जेणेकरून महिला या योजनेपासून वंचित राहणार नाहीत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

महाराष्ट्रातील महिलांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना आणि स्टार्टअप्सला पाठबळ देण्यासाठी राज्यसरकारने “कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत” नवीन योजना चालू केली. तिचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ठेवण्यात आले.

या योजनेअंतर्गत इच्छुक महिलांना त्यांचा स्टार्टअपला गती देण्यासाठी सरकारतर्फे 1 लाख ते 25 लाखांपर्यंत आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेत इच्छुक महिलांना अर्ज करण्याची तारीख 5 ऑगस्ट देण्यात आली होती. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असे आहे की राज्यातील महिला स्टार्टअपला आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करणे, आणि देशात महाराष्ट्राचे नाव महिला स्टार्टअपने ओळखले जावे.

टीप

महाराष्ट्र सरकार तर्फे राज्यातील महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनेंबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.

FAQs : योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: या सर्व योजना महाराष्ट्रात कधीपासून राबवल्या जात आहेत?
उत्तर: महाराष्ट्रात या योजना 2023 पासून राबविल्या जात आहेत. काही योजना ह्या जुन्या आहेत, त्यांच्यात बदल करून त्यांना पुन्हा सुरू केले आहे.

प्रश्न 2: सरकारी आणि खाजगी नोकरी करणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात का?
उत्तर: नाही, या योजना गरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या महिलांसाठी आहेत. बाकी योजना उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आहेत. म्हणून या योजनेत सरकारी आणि खाजगी नोकरी करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जाईल.

प्रश्न 3: लेक लाडकी योजना कधी सुरु झाली आणि योजनेसाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे?
उत्तर: लेक लाडकी योजना ही सन 2023-24 साली चालू करण्यात आली आहे. आणि या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एकूण 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

प्रश्न 4: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे?
उत्तर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रश्न 5: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट लिंक?
उत्तर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रश्न 6: लेक लाडकी योजनेची अधिकृत वेबसाइट लिंक?
उत्तर: लेक लाडकी योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रश्न 7: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत किती रुपयांचा हफ्ता दिला जातो?
उत्तर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1500 रुपयांचा हफ्ता हा महिलांच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा केला जातो.

प्रश्न 8: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुरुवात कधी करण्यात आली?
उत्तर: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुरुवात 28 जून 2024 रोजी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना याची घोषणा केली.

Leave a Comment