कोथिंबीर लागवड नियोजन : कोथिंबीर ही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात वापरली जाते. कोथिंबीरचे भरपूर आरोग्य फायदे देखील आहेत. शरीराला पोषणमूल्य देण्यासाठी कोथिंबीर नियमित वापरली जाते. भारतात कोथिंबीरची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होते. त्यात कधीही घट होताना दिसत नाही. वर्षभर कोथिंबीरची मागणी असते आणि कोथिंबीर ही शेतकरी बांधव त्यांच्या शेतात वर्षभर उगवू शकतो. कमी दिवसांचे पीक असल्याने उत्पन्नही भरपूर प्रमाणात येते. आणि त्यातून शेतकरी आर्थिक नियोजन चांगले करतो. आज आपण त्या विषयी सविस्तर माहिती पाहू यात. कोथिंबीरची लागवड, त्यासाठी घेण्याची काळजी, पाणी नियोजन, कीडनाशके, खत, काढणी व मागणी या विषयी पाहू या.
कोथिंबीर लागवडीसाठी योग्य जमीनीची निवड आणि लागणारे हवामान
1. जमीनीची निवड
कोथिंबीर लागवड करण्याआधी तुम्हाला जमिनीची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण कोथिंबीर हे कमी दिवसात येणारे उत्पादन आहे. आणि याला स्थानिक बाजारभावही चांगला असतो. जमीन निवडताना चूक झाली तर त्याचा परिणाम तुमच्या उत्पन्नावर होईल.
म्हणून हे टाळण्यासाठी काही विशेष काळजी, जमीन निवडताना पाण्याचा निचरा योग्य रीतीने होणार पाहिजे. माध्यम काळी आणि माळरान असलेली जमीन कोथिंबीर लागवडसाठी योग्य असेल. तुमच्या जमिनीचा pH हा 6.0 ते 7.5 असावा.
उत्पादन जास्त हवे असेल तर तुम्ही लागवडीच्या आधी शेणखत किंवा कंपोस्ट खात मिसळून जमिनीची मशागत करून घेणे आवश्यक आहे.
2. हवामान
कोथिंबीर लागवडीसाठी थंड हवामान लागतं. तुम्ही उन्हाळ्याच्या सुरुवातीलाही लागवड करू शकता. त्यासाठी 20°-30°C तापमान असल्यास कोथिंबीर उत्तम रीतीने वाढते. याचा नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा होईल. जास्त थंडीत तुम्ही कोथिंबीरची लागवड केली तर तिची वाढ होत नाही.
आणि जास्त उन्हात म्हणजे एप्रिल, मे, जूनमध्ये लावली तर कोथिंबीर लवकर वाळेल. म्हणून कोथिंबीर लागवड करताना हवामान अंदाज पाहणे खूप महत्वाचे आहे.
कोथिंबीर लागवडीची तयारी आणि सोपी पद्धत
1. शेतकरी बांधवानो, कोथांबीर लागवडी आधी जमिनीची मशागत करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुमची जमीन भुसभुशीत होण्यास मदत होईल.
शक्य असेल तर शेतात 8-10 टन प्रति एकर शेणखत जमिनीत मिसळावे. त्यामुळे तुमच्या जमिनीची गुणवत्ता नक्कीच सुधारेल. हे सर्व झाल्यानंतर शेतात समान बेड तयार करून घेणे.
2. कोथिंबीर लागवडीसाठी उत्तम दर्जाचे बियाणे, रोगमुक्त बियाणांची निवड करणेआवश्यक आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने बियाणे निवडले तर उत्तम ठरेल.
साधारण भारताचे हवामान पाहता भारतात “अंबर”, “सुप्रिया”, “कोथिंबीर-1”, आणि “ग्रीन लीफ” या नावाच्या सुधारित जाती उपलब्ध आहेत. तुम्हाला 8-10 किलो प्रति एकरासाठी बियाणांची गरज लागणार आहे.
3. कोथिंबीरची लागवड तुम्ही मुख्यतः खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेऊ शकता. त्यासाठीचा उत्तम वेळ खरीप हंगामात जर तुम्हाला कोथिंबीर लागवड करायची असेल तर तुम्ही जून – ऑगस्ट महिन्यात लागवड करू शकता.
आणि रब्बी हंगामात जर तुम्हाला कोथिंबीर लागवड करायची असेल तर तुम्ही ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात लागवड करू शकता.
4. तुम्ही कोथिंबीर दोन प्रकारे लावू शकता, पहिली म्हणजे बीज टोचून यात कोथिंबीरचे बीज हे जमिनीत 1.5-2 सेमी खाली पेरावी. त्या अगोदर चांगल्या उगवानासाठी तुम्ही बिजला ओलसर कापडात झाकून ठेवा. त्यामुळे बीजाची उगवण हे उत्तम होते. बीज शेतात पेरल्यानंतर त्यात पाणी भरून घ्या.
5. दुसरी पद्धत म्हणजे शेताच्या एक कोपऱ्यात बीज टोचून कोथिंबीरची रोपे तयार करून घेणे, आणि नंतर लागवडी योग्य झाल्यानंतर तिला शेतात लावताना त्यातले अंतर हे 15-20 सेमी आणि 8-10 सेमी हे दोन झाडांमध्ये अंतर ठेवावे. ही योग्य पद्धत आहे.
पण काही शंका असल्यास नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांशी बोलून योग्य मार्गदर्शन घेणे.
कोथिंबीरसाठी योग्य पाणी व्यवस्थापन
कोथिंबीर पिकाला जास्त पाण्याची गरज नसते. त्यामुळे कोथिंबीरला योग्य आणि वेळेवर पाणी दिले तर नक्कीच उत्पन्नात वाढ होईल.
1. कोथिंबीरची पेरणी किंवा लागवड केल्यानंतर लगेच पाणी भरा. जास्त जमीन ओली होईल असे नाही. जमीन ही फक्त ओलसर झाली पाहिजे.
2. पाणी भरताना विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे कारण उन्हाळ्यात तुम्हाला आठवड्यातून दोनदा आणि थंडीत आठवड्यातून एकदा पाणी भरणे आवश्यक आहे. असे पाण्याचे नियोजन केल्यास कोथिंबीरची वाढ ही योग्य रित्या होईल.
3. तुमच्या कडे पाणी मुबलक असेल आणि तुम्हाला कोथिंबीरचे उत्पन्न घ्यायचे असेल तर तुम्ही ठिबक सिंचन पद्धत वापरूनही चांगले उत्पादन घेऊ शकता.
कोथिंबीरची विशेष काळजी कशी घ्यावी
1. कोथिंबीर पिकात तुम्ही सेंद्रिय खत आणि रासायनिक खत दोन्ही वापरू शकता. त्यासाठी सर्वात आधी 10 टन शेणखत प्रति एकर वापरल्याने तुमच्या शेतीची गुणवत्ता नक्कीच सुधारेल आणि येणाऱ्या उत्पन्नातही वाढ होईल. तुम्ही तुमच्या जमिनीच्या गरजेनुसार रासायनिक खत वापरू शकता.
त्यात तुम्ही नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), आणि पोटॅशियम (K) वापरू शकता. तुम्ही त्यांची मात्रा ही खाली दिलेल्या प्रमाणे वापरू शकता किंवा अधिकाऱ्यांच्या सल्ला घेऊनसुद्धा वापरू शकता.
- जर तुम्हाला तुमच्या शेतात नायट्रोजनयुक्त खते वापरायची असतील तर त्याची मात्रा 20-25 किलो प्रति एकर असणे आवश्यक आहे.
- फॉस्फरस वापरण्याचे प्रमाण हे 10-15 किलो प्रति एकर असावे. बाकी तुम्ही अधिकाऱ्यांचा सल्ला आवश्यक घ्या.
- पोटॅशियम खताचा वापर हा 10 किलो प्रति एकर करू शकता.
2. कोथिंबीरला कीड आणि रोगांपासून वाचवण्यासाठी तुम्हाला काही उपाययोजना करावी लागतील. कोथिंबीरच्या झाडावर मुख्यतः दोन रोग जास्त प्रमाणात आढळतात:
“पाने वाळण्याचा रोग” किंवा “पांढऱ्या डागांचा रोग.” त्यासाठी तुम्ही योग्य कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरूशकता किंवा कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने अजून दुसरे सोपे आणि कमी खर्ची पर्याय वापरू शकता.
कोथिंबीरची काढणी आणि बाजारात विक्री नियोजन
1. कोथिंबीरचे पीक हे कमी दिवसांचे असते, म्हणून तिच्या लागवडीपासून 30-40 दिवसात कापू शकता. कोथिंबीरच्या पानांचा वास हा सुगंधित येत असेल, तर समजून घ्या की कोथिंबीर काढण्यासाठी योग्य झाली आहे. तुम्ही कोथिंबीरची झाडे 6-8 इंच उंच झाल्यावर तिला उपटू शकता. कोथिंबीरची सफाई ही काळजी घेऊन करायची.
2. कोथिंबीरची विक्री तुम्ही विविध मार्गांनी करू शकता. समजून घ्या, तुम्ही तिला थेट बाजारात विक्री करू शकता किंवा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांना भेटून तुम्ही विकू शकता. अशा प्रकारे विक्री केल्यास नफा तुम्हाला होईल.
3. तुम्ही तिला बाजारपेठेत सुद्धा विकू शकता. ताज्या कोथिंबीरला खूप मागणी असते. त्यामुळे बाजारातून सुद्धा तुम्हाला चांगला नफा मिळेल.
4. कोथिंबीर लागवडीसाठी आणि तिच्या देखरेखीसाठी इतर पिकांपेक्षा कमी खर्च लागतो आणि कमी दिवसांमध्ये विक्रीसाठी योग्य सुद्धा बनते. तुम्ही तिचे उत्पन्न वर्षभर घेऊ शकता आणि यामधून चांगला नफा मिळवू शकता.
5. एक सर्वेक्षणानुसार, 6-8 टन एका एकरात कोथिंबीरचे उत्पादन मिळू शकते. त्यामुळे त्याचे बाजारभाव पाहता, 20-30 रुपये प्रति किलो भाव मिळाल्यास त्यामधून तुम्हाला 1 लाख ते 1.5 लाख नफा मिळवू शकता.
शेतकरी बंधूंसाठी कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी काही टिप्स:
1. कोथिंबीरचे बियाणे निवडताना उच्च दर्जाच्या बियाणांची निवड करा. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात सुद्धा वाढ दिसेल.
2. कोथिंबीर लागवडीसाठी योग्य जमीनीची निवड करा, जमिनीतला पाणी निचरा चांगला असावा.
3. कोथिंबीरला आवश्यक प्रमाणात आणि योग्य पाणी घाला, जेणेकरून ती हिरवी आणि ताजी राहील. पाने वळणार नाहीत. पाणी कमी असेल तर ठिबक वापरा, जेणेकरून कमी पाण्यातही तुम्ही कोथिंबीरचे उत्तम उत्पन्न घेऊ शकता.
4. कोथिंबीरला कीड आणि रोगापासून बचावासाठी बुरशीनाशक आणि रासायनिक फवारणी करून घ्या.
5. कोथिंबीरची काढणी ही योग्य वेळी करणे आवश्यक आहे, आणि तिला योग्य रित्या विका म्हणजे त्या मधून तुम्हाला जास्त नफा मिळेल.
टीप
अधिक माहितीसाठी तुम्ही नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करा.
हे देखील वाचा – रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती |
FAQs :- वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1. कोणत्या हवामानात कोथिंबीर लागवड केली तर चांगले उत्पादन येईल?
उत्तर :- असे मानले जाते की कोथिंबीर लागवडीसाठी 20°C ते 30°C थंड हवामानामध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढते, म्हणून तुम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये कोथिंबीरचे उत्पन्न घेऊ शकता.
प्रश्न 2. कोथिंबीरच्या जास्त चालणाऱ्या बियाणांची जाती कोणत्या?
उत्तर :- अंबर, सुप्रिया, कोथिंबीर-1 आणि ग्रीन लीफ हे कोथिंबीरच्या ह्या जाती जास्त प्रमाणात वापरले जातात.
प्रश्न 3. कोथिंबीरच पीक हे तोडण्यायोग्य झाले आहे हे कसे ओळखायचे?
उत्तर :- साधारण कोथिंबीरच पीक हे 30-40 दिवसात तोडण्यायोग्य बनते किंवा त्यांचा पानांचा सुगंधीत वास यायला लागल्यावरही तुम्ही त्याला काढू शकता. किंवा कोथिंबीरची झाडे 6-8 इंच उंच झाल्यावर सुद्धा तुम्ही तिची काढणी करू शकता.
प्रश्न 4. कोथिंबीरचे सरासरी एका एकरात किती उत्पादन येते?
उत्तर :- कोथिंबीरचे सरासरी एका एकरात 8-10 टन इतके उत्पादन मिळते, अपेक्षित असते. पिकाचे नियोजन योग्य असेल तर उत्पादन अजून थोडी वाढ पाहायला मिळेल.