प्लास्टिक मल्चिंग पेपरवर सरकार देत आहे 50 टक्के अनुदान

शेतात प्लास्टिक पेपर जमिनीवर अंथरून पीक घेण्याची एक पद्धत आहे. त्यासाठी विशेष पेपराचा वापर केला जातो, त्याला मल्चिंग पेपर असे म्हणतात. प्लास्टिक मल्चिंग पेपरच्या वापरामुळे जमिनीवरील ओलावा टिकून राहतो, गवत उगवण्याचे प्रमाण कमी होते आणि पिकांच्या उत्पादनात वाढ होते. या पेपरसाठी आता सरकार ५० टक्के अनुदान देते. चला तर पाहू त्या सविस्तर माहिती.

Table of Contents

प्लास्टिक मल्चिंग पेपर (Plastic Mulching Paper)

शेतकरी आता शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. त्यातच एक प्रयोग म्हणजे प्लास्टिक मल्चिंग पेपर. प्लास्टिक मल्चिंग पेपर हा शेतात भाजीपाला किंवा फळबाग लागवडीच्या जमिनीवर वापरला जातो. मल्चिंग पेपरचा वापर केल्याने मातीचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. गवतावरसुद्धा नियंत्रण ठेवता येते.

त्यामुळे तन काढणीवर होणारा खर्चही काही प्रमाणात वाचतो. आणि मुख्य म्हणजे मल्चिंग पेपरच्या वापरामुळे शेतकऱ्याच्या उप्पन्नात वाढ होते. साधारण हा पेपर तीन वेगवेगळ्या प्रकारात येतो: ब्लॅक मल्चिंग पेपर, सिल्वर/ब्लॅक मल्चिंग पेपर आणि व्हाईट/ब्लॅक मल्चिंग पेपर.

सरकारने पेपरचे महत्त्व समजून, याचा उपयोग जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात करावा आणि येणाऱ्या उत्पन्नात अजून जास्त भर करावी म्हणून सरकार हा पेपर विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देत आहे. मुख्यतः 50 मायक्रॉन, 25 मायक्रॉन, 100 आणि 200 मायक्रॉन पेपर समाविष्ट आहे.

मल्चिंग पेपरचे 3 मुख्य प्रकार आणि त्यांच्या विषयी माहिती

plastic mulching paper types

1. ब्लॅक मल्चिंग पेपर

शेतकरी वर्गात या पेपरची मागणी जास्त आहे. मुख्य कारण म्हणजे ब्लॅक पेपर सूर्यप्रकाश शोषतो. यामुळे गवताची वाढ जास्त होत नाही. आणि पिकाला याचा जास्त फायदा होतो.

2. सिल्वर/ब्लॅक मल्चिंग पेपर

या पेपरच विशेष म्हणजे याची एक बाजू ही काळ्या रंगाची तर दुसरी बाजू ही चांदीच्या रंगाची येते. हा पेपर वापरल्याने चांदीच्या बाजूने प्रकाश हा परिवर्तित होतो आणि जमीन ही थंड असते. या पेपरचा उपयोग उन्हाळ्यात केला जातो.

3. व्हाईट/ब्लॅक मल्चिंग पेपर

या पेपरचा विशेष वापर हिवाळ्यात केला जातो. व्हाईट बाजूने प्रकाश शोषला जातो आणि जमीनीचे तापमान कमी ठेवण्यात मदत होते.

प्लास्टिक मल्चिंग पेपरचे फायदे | Benefits of Plastic Mulching Paper

plastic mulching paper benefits

1. जमिनीतला ओलावा टिकून ठेवण्यासाठी

पेपर जमिनीवर पसरविल्याने पेपराखालील ओलावा टिकून राहतो. पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण कमी होते, आणि शेतकरी कमी पाण्यात शेती करून जास्त उत्पन्न घेऊ शकतो.

2. गवतावर आळा

पेपरच्या वापरामुळे गवतावर नियंत्रण ठेवता येते. सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे गवत जास्त वाढत नाही.

3. तापमानावर आळा

मल्चिंग पेपर वापरल्याने तापमानावर नियंत्रण ठेवता येते. उन्हाळ्यात जमिनीला थंड ठेवतो आणि हिवाळ्यात जमिनीला गरम, त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.

4. मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी

मल्चिंग पेपरचा योग्य वापर केल्याने मातीमधले पोषक तत्वे टिकून राहतात, कारण मातीची धूप कमी होते, त्यामुळे जमिनीचे पोषण हे संतुलित राहण्यास मदत होते.

5. कीटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी

प्लास्टिक मल्चिंगमुळे कीटकनाशकांचे प्रमाण कमी होते आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे त्यांची पुरेशी वाळ होत नाही.

असे खूप सारे फायदे शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंग पेपरमुळे होताना दिसत आहेत आणि शेतकरी वर्गात हा पेपर वापरण्याचे प्रमाणही वाढत आहे.

प्लास्टिक मल्चिंग पेपर वापरण्याची सोपी पद्धत

या पेपरला वापरण्याची पद्धत सोपी आहे. शेतात जिथे भाजीपाला आणि फळबाग पीक लावायचे आहे, त्या ओळीमध्ये प्लास्टिक पसरवला जातो. पिकांना लावण्यासाठी ठराविक अंतरावर छोटे छिद्र करून रोप लावले जाते.

असे केल्याने कमी पाण्यातही शेती करता येते, जमिनीची धूप कमी होते, तणाला आणि कीटकांना पुरेसा सूर्यप्रकाश भेटत नाही, त्यामुळे ते जास्त प्रमाणात वाढत नाहीत आणि पिकांचे नुकसान कमी होते आणि या उलट पिकाची वाढ होते आणि उत्पन्नात सुद्धा वाढ होते.

मल्चिंग पेपरवर मिळणाऱ्या अनुदानाबद्दल

अनुदान हे दोन मुख्य भागात असणार आहे. आणि योजनेचा लाभ हा फक्त २ हेक्टर शेत जमिनीपर्यंत दिला जाणार आहे.

अनुक्रमांकमिळणाऱ्या अनुदानाबद्दल
1शेत हे सर्वसाधारण क्षेत्रात येत असेल, तर त्यासाठी प्रति हेक्टर 32,000 रुपये इतका खर्च येऊ शकतो. तर सरकार याच्या 50 टक्के अनुदान म्हणजे जास्तीत जास्त 16,000 रुपये इतके अनुदान देऊ शकते.
2डोंगराळ भागात जमीन असेल तर त्या साठी 36,800 रुपये खर्च येऊ शकतो. तर सरकार याच्या 50 टक्के म्हणजे 18,400 रुपये इतका अनुदान देऊ शकते.​

या योजनेसाठी कोण पात्र असेल?

plastic mulching paper subsidy patrata

अनुक्रमांकयोजनेसाठी पात्रता
1शेतकरी हा सुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2शेतकरी समूह (गट करून ही योजनेचा लाभ मिळवता येतो).
3बचत गट समूह योजनेचा लाभ घेऊ शकते.
4शेतकरी उत्पादक कंपनी सुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकते
5सहकारी संस्था – (शेतकऱ्यांनी स्वतःच्या मदतीसाठी तयार केलेल्या सहकारी संस्था, या संस्थांमार्फत शेतकऱ्यांना भरपूर लाभ मिळत असतो. जसे की कर्ज, बियाणे, खते, तंत्रज्ञान, वित्तीय सहाय्य व अन्य लाभ).

हे सर्व या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

योजनेसाठी लागू केलेले नियम व अटी

अनुक्रमांकनियम व अटी
1शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2त्याच्या जवळ शेती करण्यासाठी योग्य शेती असायला पाहिजे.
3शेतकरी ने या आधी मल्चिंग पेपर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
4शेतकरी जवळ राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे. (आधार संलग्न पाहिजे)
5शेतकर्‍याला आधी स्व खर्चाने मल्चिंग पेपर विकत घ्यायचा आहे. नंतर कागदांचा पाठपुरावा करून, शेतकऱ्याला त्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम पाठवण्यात येईल.
6या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला घेता येईल.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

plastic mulching paper subsidy documents

अनुक्रमांकलागणारी कागदपत्रे
1लाभार्थ्यांचे आधार कार्ड – (आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, फोटो आणि इतर माहिती अचूक असणे).
2लाभार्थ्यांचे राशन कार्ड – (रेशन कार्ड मध्ये तहसील शिक्का आणि सही असणे आवश्यक).
3शेतीचा 7/12 उतारा (मागील ३ महिन्यांचा असावा, त्यात संबंधित अधिकाऱ्यांची सही आणि शिक्का असणे आवश्यक किंवा ऑनलाइन उतारा पण चालेल).
48अ प्रमाणपत्र हे नवीन असणे आवश्यक आहे, ऑनलाइन किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून घेतलेले हवे. त्या प्रमाणपत्रावर अधिकाऱ्याची सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे.
5लाभार्थ्यांचे बँकेचे पासबुक (बँकेचं नाव, खाते नंबर, IFSC नंबर, खाते धारकाची माहिती अचूक असणे).
6लाभार्थी हा अनु सूचित जाती व अनु जमाती प्रवर्गातील असेल तर त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत

पाऊल 1: लाभार्थीने महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे – येथे क्लिक करा

पाऊल 2: नंतर लाभार्थीने त्याच्या “आधार कार्ड” किंवा “Username” ने “लॉगिन” करून घ्या.

पाऊल 3: नंतर मल्चिंग पेपर अनुदानासाठी अर्ज करा आणि सर्व माहिती भरून तिला “जतन करा” या बटणावर क्लिक करा.

पाऊल 4: लाभार्थ्याला अर्ज भरल्याचा “नंबर” मिळेल. म्हणजे योजनेसाठीची ऑन लाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली.

ऑफलाईन फॉर्म भरण्याची पद्धत

स्टेप 1: शेतकऱ्याला नजीकच्या कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल.

स्टेप 2: एक अर्ज विकत घेऊन त्यात संपूर्ण माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज हा कार्यालयात जमा करायचा आहे.

स्टेप 3: अशा प्रकारे तुमची मल्चिंग पेपर योजनेसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

हे देखील वाचा – कोथिंबीर लागवड नियोजन: योग्य नियोजन आणि कमी खर्चात भरपूर उत्पादन

FAQs : योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1: किती मायक्रॉन मल्चिंग पेपरवर सरकार अनुदान देणार आहे?
उत्तर: सरकार 25 मायक्रॉन, 50 मायक्रॉन, 100 आणि 200 मायक्रॉन मल्चिंग पेपरवर अनुदान देणार आहे.

प्रश्न 2: मल्चिंग पेपरचे 3 मुख्य प्रकार कोणते?
उत्तर: ब्लॅक मल्चिंग पेपर, सिल्वर/ब्लॅक मल्चिंग पेपर, व्हाईट/ब्लॅक मल्चिंग पेपर हे प्रकार जास्त प्रमाणात वापरले जातात.

प्रश्न 3: या योजनेत शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान देण्यात येणार आहे?
उत्तर: या योजनेत शासनाने 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रश्न 4: मल्चिंग पेपर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: मल्चिंग पेपर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Leave a Comment