महाराष्ट्रात रब्बी हंगामात कांदा हा ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात लागवड करणे एक चांगला वेळ आहे. या हंगामात कांदा लागवड केल्याने शेतकरी उत्तम उत्पादन घेऊ शकतात. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना कांदा लागवडीचे योग्य नियोजन आणि कांदा लागवडीविषयी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पीक तयार होण्यासाठी 120-150 दिवस लागतात, आणि त्याची काढणी मार्च-एप्रिलमध्ये केली जाते. असे योग्य नियोजन केल्याने शेतकरी कांदा उत्पन्नातून दर्जेदार उत्पादन घेऊ शकतात.
कांदा लागवड करण्यासाठी करावयाची तयारी
रब्बी हंगामातील कांदा हा 120 ते 150 दिवसांमध्ये घ्यावयाचे पीक आहे. म्हणजे 4 ते 5 महिन्यांचे पीक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या जमिनीची निवड करावी म्हणजे कांदा पिकाला पोषक असे नत्र मिळतील. जमिनीची मशागत, त्यासाठी तुम्हाला शेती ही मऊ आणि सुपीक तयार करावी लागेल. पाण्याचे व्यवस्थापन, खताचे योग्य नियोजन, असे भरपूर कामे शेतकऱ्यांना करावी लागतील. चला तर त्या विषयी सविस्तर पाहू या.
कांदा लागवडीसाठी जमिनीची निवड कशी करावी
1. शेतात हलकी आणि मध्यम काळी माती असेल तर कांदा लागवडीसाठी योग्य मानली जाते.
2. कांदा लागवड करण्यासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन म्हणजे जमिनीत पाणी साचत नाही, अशी जमीन योग्य असते.
3. शेतातील माती ही मऊ आणि सुपीक असेल तर याचा फायदा तुम्हाला कांदा उत्पादनात पाहायला मिळेल.
4. मातीची पाणी धरण्याची क्षमता चांगली असावी. त्यासाठी माती परीक्षण करून घेणे, त्यामुळे तुम्हाला पाण्याचे आणि खताचे नियोजन करणे सोयीचे होईल.
5. शेतातील मातीची पीएच 6.0 ते 7.5 च्या दरम्यान असेल तर कांदा लागवडीसाठी योग्य असेल.
6. जमिनीची नांगरणी करून, 2-3 वेळा मशागत करून घ्या. जेणेकरून जमीन सुपीक आणि मऊ होईल.
कांद्याची योग्य वाण कशी निवडावी
शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड करण्यासाठी योग्य बियाणे निवडणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने सरकार अधिकृत बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी केली पाहिजे. खरेदी करण्याअगोदर त्यांनी उत्पादन तारीख तपासून विकत घेणे, बियाणांची रोगप्रतिकार क्षमता आणि जास्त उत्पादन देणारे वाण निवडावे.
जेणेकरून पिकावर बुरशी किंवा इतर कीटनाशकापासून बचाव होऊ शकतो आणि उत्पादन वाढू शकते. रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी निफ्टाई किंवा अग्रोस्टारने शिफारस केलेली बीज योग्य असेल.
कांदा लागवड आणि पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे
1. शेतकऱ्यांनी कांदा लागवड करण्यासाठी आधी जमीनीत पाणी भरून घेणे म्हणजे ओल्या जमिनीवर रोपांची लागवड केली असता योग्य असते. रोपांची लागवड ही योग्य अंतराने केली पाहिजे, जेणेकरून रोपांना हवा आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळेल. कांद्याचं रोप जास्त खोलीवर लावू नये. रोप लावल्यानंतर जमिनीला दाबून देणे जेणेकरून रोपांच्या मुळांना हवा लागणार नाही.
2. कांदा लागवड केल्यानंतर पाण्याचे नियोजन करणे खूप महत्वाचे आहे. कांद्याला नियमित 5-7 दिवसांनी पाणी द्यावे. पण पाण्याचे नियोजन हे जमिनीत किती ओलावा टिकून आहे आणि हवामान कसे आहे, याचा अभ्यास करून पाणी नियोजन करणे आवश्यक आहे.
जास्त पाणी भरल्याने मुळांचा ऱ्हास होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन वापरल्यास योग्य असेल. कारण याने पाण्याची बचत होतेच, पण मशागतीसाठीही कमी खर्च येतो आणि उत्पादन जास्त होते.
कांद्यावरील कीड आणि रोगांचे नियंत्रण आणि योग्य खताचे व्यवस्थापन कसे करावे
1. फवारणी आणि खताचे वापर करण्यापूर्वी आपल्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी संवाद करून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. कांद्यावर मावा कीटक आणि थ्रिप्स प्रकारचे कीटक आढळून येतात. त्यासाठी योग्य बुरशीनाशक वापरून फवारणी करावी (कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर मिश्र करून पिकावर फवारणी करावी).
ही फवारणी तुम्ही पांढऱ्या डागांच्या रोगावरही करू शकता. थ्रिप्स कीटक दिसत असेल तर त्यासाठी इमिडाक्लोप्रिड किंवा फिप्रोनील यांची फवारणी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही नियमित रोगांची प्रतिबंधात्मक नियोजन करत राहिलात तर नक्कीच तुम्हालाही कांद्याचे भरघोस उत्पन्न मिळेल.
2. शेतकरी मित्रांनो, कांद्या पिकाला लागवडीवेळी आणि नंतर वेळोवेळी खत डोस देत राहणे, तुमच्याकडे सेंद्रिय खते उपलब्ध असेल तर कांदा लागवडीपूर्वी शेणखत आणि गांडूळखत एकत्र करून वापरा, आणि जर सेंद्रिय खत उपलब्ध नसेल तर तज्ञाच्या सल्ल्याने आणि तुमच्या जमिनीच्या मातीच्या गुणवत्तेच्या आधारे रासायनिक खते वापरा.
त्यात तुम्ही नत्र, स्फुरद, आणि पालाश हे नियमित टप्प्यांनुसार रोपांना देत राहा. लागवडीपूर्वी तुम्ही तुमच्या क्षेत्रफळानुसार नत्र वापरू शकता. रासायनिक खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश या खतांचाही वापर करू शकता. पण हे सर्व नियोजन तुम्ही शक्यतो तुमच्या कृषी तज्ञांकडून सल्ला घेऊन करणे.
कांद्याची काढणी, त्याचे नियोजन आणि विशेष घ्यावयाची काळजी
1. कांद्याची काढणी करताना हवामानाचा अंदाज घेऊन आणि कांद्याची पात ही वाळल्यानंतर तुम्ही कांदा काढण्यास सुरुवात करू शकता, कांदा काढल्या नंतर त्याला सावलीत सुकन्या साठी ठेवावे जेणे करून ते खराब होणार नाही.
2. कांद्याची काढणी करताना हवामानाचा अंदाज घेऊन म्हणजे उष्ण आणि कोरडे हवामान असेल तेव्हा आणि कांद्याची पात ही वाळल्यानंतर तुम्ही कांदा काढण्यास सुरुवात करू शकता. कांदा काढल्यानंतर त्याला सावलीत सुकण्यासाठी ठेवावे जेणेकरून ते खराब होणार नाही.
3. कांदा लागवड केल्यानंतर नियमित पिकाचे निरीक्षण करत राहा. पिकावर येणाऱ्या कीटकांवर उपाययोजना करा, शेतात तण नियंत्रणासाठी उपाययोजना करत राहा. कांदे भरून ठेवताना थंड आणि कोरडे ठिकाण निवडा, जेणेकरून सुकलेले कांदे खराब होणार नाहीत आणि बाजारात कांद्याला चांगला भाव मिळेल.
शेतकरी बंधुनो कांदा लागवडीचे खूप सारे फायदे आहेत
1. कांदा लागवडीसाठी कमी खर्च लागतो, आणि कांदा हा कमी दिवसात येणारे पीक आहे.
2. कांदा हे एक प्रमुख नगदी पीक आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टीने खूप महत्त्वाचे पीक आहे.
3. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणाचे नियोजन असते, ते शेतकरी वर्षभर साठवण करून योग्य बाजारभाव पाहून विकू शकतात.
4. ग्रंथांमध्ये आरोग्यासाठी कांद्याचे फायदे लिहिले आहेत.
5. भारतात कांद्याचे उत्पादन महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आणि गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
6. देशात नाशिक शहर कांदा बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
टीप
अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क साधा.
FAQ’s: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1: कांद्याचे पीक किती दिवसाचे असते?
उत्तर: लागवडीपासून कांदा हा 120 ते 150 दिवसात घ्यावयाचे पीक आहे.
प्रश्न 2: 1 एकरात किती कांदा पिकतो?
उत्तर: एका एकरात 110 ते 150 क्विंटलपर्यंत कांद्याचे उत्पादन होते.
प्रश्न 3: कांद्याचे पीक किती महिन्यांचे असते?
उत्तर: कांद्याचे पीक 4 ते 5 महिन्यांचे असते.
प्रश्न 4: भारतात कांद्यासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?
उत्तर: भारतात कांद्यासाठी सर्वात जास्त नाशिक शहर प्रसिद्ध आहे.
प्रश्न 5: महाराष्ट्रातील सर्वोत्तम कांदा वाण कोणता?
उत्तर: महाराष्ट्रातील सर्वोत्तम कांदा वाण भीमा रेड आहे.
प्रश्न 6: भारतात कोणत्या राज्यात कांद्याची सर्वात जास्त लागवड होते?
उत्तर: भारतात सर्वात जास्त लागवड ही महाराष्ट्रात केली जाते. ती इतर राज्यांच्या तुलनेत 30% जास्त कांदा उत्पादक आहे.
प्रश्न 7: जगात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन करणारा देश कोणता आहे?
उत्तर: जगात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन करणारा देश भारत आहे, आणि दरवर्षी भारत एकटा 26,738 मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन करतो.
प्रश्न 8: भारतामधील कोणते गाव कांद्यासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: भारतामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव हे सर्वात मोठे कांदा बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न 9: भारतात कांदा उत्पादनात अग्रेसर राज्ये कोणती?
उत्तर: भारतात कांदा उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आणि गुजरात राज्ये अग्रेसर आहेत.